
Pune News : कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना रोहित पवार हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले पोरगा आहे. ते इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकलेले आहेत त्यांना जिल्हा परिषद शाळेचे काय कळतंय अशी टीका केली होती. या टीकेला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर दिला आहे.
आमदार रोहित पवार हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. आमदार धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची सुपारी देऊ केली होती, असा आरोप सध्या करण्यात येत आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, बीड ही संतांची आणि पवित्र भूमी आहे. मात्र, काही नेत्यांच्या विशिष्ट राजकीय पद्धतीमुळे बीडचं नाव खराब झाला आहे. जर पोलीस प्रशासनाचाच वापर करून तुम्ही जर कोणालातरी सुपारी देऊन उडवण्याचा प्रयत्न करत असाल.
तुमचा मित्र वाल्मिक कराड याला तुम्ही राजकारणासाठी वापर केला. मी आता असं होत असेल पोलीस प्रशासनातील एखादा व्यक्ती येऊन म्हणत असेल की, माझा वापर सुपारी देण्यासाठी होणार होता तर आणखी खोलात जाऊन पोलिसांपैकी कोण कोण यामध्ये सहभागी आहे, याची चौकशी होणं आवश्यक असल्याचं रोहित पवार म्हणाले.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले,मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असं ते म्हणाले, मात्र सोन्याचा चमचा घेऊन कोणी जन्माला येत असेल अथवा पानाला चुना लावत राजकारणामध्ये येत असेल हे चर्चेसारखे विषय नाही. सद्य परिस्थितीमध्ये धोरणात्मक बोललं पाहिजे. माझ्या मतदारसंघांमध्ये काय विकास काम केली ही सर्व तुम्हाला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतील.
मी साधा आमदार आणि पक्षाचा कार्यकर्ता आहे. जर एक साधा आमदार मतदारसंघांमध्ये काय करू शकतो हे दाखवून दिला आहे.तर तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात त्यामुळे त्या कॅबिनेट मंत्रीपदाचा वापर करा आणि लोकांना दाखवून द्या लोकांना परिवर्तन करून दाखवा असा आव्हान रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांना दिल.
राजकारणाच्या येणाऱ्या पिढीमध्ये माझ्यासारखा मुलगा जर चांगलं काही करू असेल आणि त्याला तुम्ही सोन्याचा चमचा म्हणून सारखंच म्हणणार असाल,तर एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा देखील सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आहेस असं म्हणायचं का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. गुलाबराव पाटील यांना विशेष समजत नसल्याने ते फक्त सोन्याचा चमचा आणि पोट्ट्या हे सोडून काहीच बोलत अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.