Hasan Mushrif  Sarkarnama
महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh: मुश्रीफांच्या दोन शिलेदारांनी भाजप नेत्यांचे कान टोचले; भाजपचाही पलटवार, छुपा मित्र जाहीर करा!

Hasan Mushrif Vs BJP Gokul Dudh Sangh Politics:नाथाजी पाटील यांनी खडसावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप शिवसेना जनसुराज्य यांच्याशिवाय अन्य कोणी मित्र पक्ष आहेत का ? हे युवराज बापू व भैया माने यांनी जाहीर करावे, अशी मागणी केली.

Rahul Gadkar

चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणि गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधील संबंध ताणले गेले आहेत.

आगामी गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांचे दोन शिलेदारांना भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. त्यावर संतापलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीलाच कानपिचक्या देत राष्ट्रवादी काँग्रेसचा छुपा मित्र कोण? हे जाहीर करा, असा अप्रत्यक्ष सवाल मुश्रीफ यांना केला आहे.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त पॅनल बनवावे, अशी मागणी केडीसीसी चे संचालक भैया माने व गोकुळचे स्वीकृत संचालक युवराज बापू पाटील यांनी केले. त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी पत्रक काढत खडसावले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप शिवसेना जनसुराज्य यांच्याशिवाय अन्य कोणी मित्र पक्ष आहेत का ? हे युवराज बापू व भैया माने यांनी जाहीर करावे, अशी मागणी केली.

निवडणुकीची घाई का?

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुक ही वेगळ्या वळणावर गेली आहे. ११०८ दूध संस्थांचा अवसायनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. या संस्थांच्या वतीने मी स्वतः माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये या संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी न्यायालयात गेलो आहे .अजून या ११०८ दूध संस्थांच्या सभासदत्वाचा व मताचा अधिकाराचा प्रश्न प्रलंबित असताना या लोकांना या निवडणुकीची घाई का लागली .हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित होतो. कारण या ११०८ दुध संस्था या मताला पात्र होणे अत्यंत आवश्यक आहे.

महायुतीतील बेबनावाला खतपाणी

मुळात भैय्या माने व युवराज बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य मित्र पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडून घ्यावी, अशी मागणी करीत आहेत . पण अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप , शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) व जनसुराज्य हे मित्रपक्ष सोडून अन्य कोणी छुपे मित्र पक्ष आहेत का? याचा खुलासा करणे आवश्यक आहे .गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता यावी अशी इच्छा कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे नेत्याचे असताना सुद्धा युवराज बापू पाटील व व भैय्या माने यांनी असे पत्रक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा महायुतीतील बेबनावाला खतपाणी घालण्यासारखेच प्रकार आहेत .त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी या दोघांना विनंती आहे की अशा पद्धतीने पत्रकबाजी करून पुन्हा महायुतीत बेबनाव होईल असे कृत्य करू नये .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT