प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनालाही आज पाचव्या दिवशी धार चढली. बच्चू कडू यांच्या समर्थनात 'प्रहार'बरोबर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे मैदानात उतरला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.
पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. धक्काबुक्कीनंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना भिडत, चांगलीच हाणामारी केली. यात काही कार्यकर्ते मंत्री शेलार यांच्या वाहनावर पडले. कांदिवली पूर्व परिसरातील फेरीवाले आशिष शेलार यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना ही हाणामारी झाली. भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि फेरीवाल्यांना रोखल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समतानगर पोलिस ठाणेमध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत.
केंद्र सरकारने (Central Government) केल्या 11 वर्षांत देशातील विविध धार्मियांचे धार्मिक स्तळ एकमेकांशी जोडण्यासाठी चारधाम, राम मंदिर, बौद्ध सर्किट, पालकी मार्ग, अमरनाथ, बेट द्वारका, चौरासी कोसी परिक्रमेच्या 1 लाख कोटींच्या प्रकल्पांवर काम केले. या महामार्गामुळे भारतातील धार्मिक पर्यटन चार पटींनी वाढून 2 लाख कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
भारत-पाकिस्तानमधील शीतयुद्धाबरोबर अमेरिकेतील ट्रम्प सरकारचे जागतिक धोरण, रशिया-युक्रेन आणि इराण-इस्त्राइल युद्धामुळे तणावाच्या परिस्थितीमुळे सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. सोन्याच्या (GOLD) लाखांचा टप्पा ओलंडला असून, ही जागतिक अस्थिरतेमुळे त्यात अधिक वाढ होऊ शकते. प्रतितोळा म्हणजेच, दहा ग्रॅमला 98 हजार 340 रुपये भाव झाला असून, तो जीएसटीसह लाख रुपयांवर गेला आहे. अहिल्यानगरमध्ये सोन्याचे भाव 99 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम असून तो जीएसटीसह 1 लाख 2 हजार 485 रुपये होणार आहे. चांदीचा भाव एक लाख 7 हजार प्रति किलो असून, तो जीएसटीसह 1 लाख 13 हजार 425 रुपये असणार आहे, अशी माहिती IBJA उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सागर कायगांवकर यांनी दिली.
देशातील चांगल्या महामार्गामुळे मालवाहतुकीच्या खर्चात सहा टक्क्यांची घट झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला. आयआयएम बेंगळुरू, आयआयटी कानपूर, आयआयटी चेन्नई संस्थांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देत मंत्री गडकरी यांनी हा दावा केला आहे.
इराण-इस्त्रायलच्या युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा परिणाम जागतिक पातळीवर जाणवू लागला आहे. एअर ट्राफिक यामुळे कोलमडली असून, भारताने (India) या युद्धामुळे अनेक विमान उड्डाणं रद्द केली आहे. यात प्राथमिक माहितीनुसार 16-20 विमाने परत बोलवल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय थायलंडमध्ये एका एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले आहे.
अहमदाबाद इथं अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया विमानाचा ब्लॅग बाॅक्स सापडला आहे. दोनपैकी एक ब्लॅग बाॅक्स सापडल्याने विमान अपघाताचं कारण समोर येणार आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे. कॉकपिट वॉयस रिकॉर्डर देखील सापडला आहे. यामुळे अपघाताचे (Accident) कारण कळणे सोपं होणार आहे.
एअर इंडियाची मुंबईहून (Mumbai) लंडनला जाणारे विमान अर्धा रस्त्यातच माघारी फिरल्याचा प्रकार समोर आलं आहे. लंडनला जाणारे विमान पुन्हा मुंबईत परतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. फ्लाइटरडार24 नुसार, एअर इंडियाचे विमान AI-129 ने आज सकाळीच मुंबईहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र पुन्हा हे विमान मुंबईत परतले आहे. यामागचं कारण काय, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
अहमदाबादकडून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमानाच्या अपघाताचा, तपास अमेरिकास्थित नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड करणार आहे. गुजरात अहमदाबाद इथं झालेला हा अपघात भीषण असून, यात विमानात 242 प्रवासी होते. हा अपघात कसा झाला, याचा तपास करून अमेरिका नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड भारताला मदत करणार आहे. या अपघातात ब्रिटनचे 53प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.