RBI Cut Down Repo Rate Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Live Update : मोठी बातमी; RBI कडून रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Pradeep Pendhare

RBI Cut Down Repo Rate : मोठी बातमी; RBI कडून रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) रेपो रेटमध्ये कपात केल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. त्यामुळे रेपो रेटे आता 5.50 टक्के इतका झाला आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्यास बँकांकडून साधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाते.

Maharashtra Jeevan Pradhikaran : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयच्या स्टोर रूमला आग...

वाशिम शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील स्टोर रूमला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत कार्यालयातील अनेक महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र अनेकांनी आगीबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

Yavatmal Crime Update : यवतमाळमध्ये 500च्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भारतीय चलनातील 500च्या बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. यवतमाळच्या पुसदच्या पोलिसांनी (Police) कारवाईत चौघांना अटक केली. यात 1 लाख 89 हजार 624 रुपयाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. राजकुमार पारधी (रा. सावळी), तुकाराम गुहाडे (रा. हर्षी), भाऊसाहेब पतंगे (रा. काॅदूर), रामदास भरकाडे (रा. डोणवाडा) अशी अटक केलेल्यांची आरोपीचे नावे आहेत.

BJP : भाजप आमदार धस यांच्या गौप्यस्फोटावर भीमराव धोंडेंचा हल्लाबोल

भाजप आमदार सुरेश धस यांनी सुपेकर यांनी 300 कोटी घेतल्याचा गौप्यस्फोटावर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. कोणताही अधिकारी 300 कोटी रुपये मागू शकत नाही. 300 कोटी घेणे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यासारखं आहे, आपले पोलिस लंडनच्या पोलिसांपेक्षा चांगले काम करत आहेत, असे माजी आमदार धोंडे यांनी म्हटले आहे.

ShivSena Eknath Shinde : मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थित अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा मेळावा

शिवसेना मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थित शनिवारी (ता. 7) दुपारी दोन वाजता अहिल्यानगर शहरात मेळावा आयोजित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार असून, नगर शहर, श्रीगोंदा आणि पाथर्डीतील स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक; व्याजदरात सलग तिसरी कपात?

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीचा निर्णय आज शुक्रवारी अपेक्षित आहे. बहुतांश विश्लेषकांमध्ये कपातीबाबत सहमती दिसून येत असली, तरी अनेकांच्या मते ती मागील दोन खेपांप्रमाणे पाव टक्केच राहील, तर काहींच्या मते यंदा थेट अर्धा टक्का कपात केली जाऊ शकते.

Nitesh Rane Vs Idris Naikwadi : मंत्री नीतेश राणेंना वेळीच आवर घाला; NCP आमदार नायकवडी यांची मागणी

हिंदू नेता बनण्याच्या नादात (BJP) मंत्री नीतेश राणे बालिश वक्तव्य करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाचाळवीराला वेळीच आवर घालावा, असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. मंत्री राणे बकरी ईदच्यानिमित्ताने मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करत असल्याचा आरोप आमदार नायकवडी यांनी केला.

ladki bahin yojana : 'लाडकी'साठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला

ladki bahin yojana

सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागागकडे 7 हजार 314 कोटी निधी कमी आहे. वळविलेला निधी फक्त लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना वितरीत केला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाचं खातं शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे महायुतीमध्ये धुसफूस होण्याची शक्यता आहे.

Water Scheme : पाणीपुरवठ्याच्या 900 योजनांची मान्यता रद्द

नागरिकांचा विरोध, निधीची टंचाई आणि ठेकेदारांचे असहकार्य यामुळे गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या (Water) 900 योजनाच रद्द करण्याचा निर्णय मृद आणि जलसंधारण विभागाने घेतला आहे.

Naxal Encounter : जहाल नक्षलवादी नेता टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधारक याचा खात्मा

जहाल नक्षलवादी (Naxal) नेता तसेच केंद्रीय समिती सदस्य टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधारक ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहचलम नायडू (वय 65, चिंतलपौंडी, आंध्रप्रदेश) हा गुरूवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात ही चकमक झाली. सुधाकर याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचे मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते.

Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा

Shivrajyabhishek Sohala

किल्ले रायगडगावर सहा जून तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. रायगड (Raigad) जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांच्या जेवणासाठी पाच हजार किलो तांदूळ आणि एक लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच गडावर15 बेडचे रुग्णालय, तर पाचाड इथं पाच बेडचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT