SC Final Decision On Shivsena : Supreme Court Result : Hearing on Shivsena : Rahul Shewale Sarkarnama
महाराष्ट्र

Hearing on Shivsena : निकाल येताच शिंदेची नवी चाल; गोगावलेंची पुन्हा..., राहुल शेवाळेंची माहिती

Supreme Court Result : गोगावलेंच्या निवडप्रक्रियेत अनेक त्रुटी न्यायालयाचे निरीक्षण..

सरकारनामा ब्यूरो

SC Final Decision On Shivsena :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असतं. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरतात, त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या विधिमंडळातील प्रतोद भरत गोगावले यांची प्रतोद पदावरील नियुक्ती ही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचे म्हंटले आहे. यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेकडून नवीन राजकीय डावपेच आखला जातोय. भरत गोगावलेंची (Bharat Gogawale) व्हिप म्हणून निवडप्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू करू, असे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हंटले आहे. गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता शिवसेनेकडून कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

खासदार राहुल शेवाळे यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'शिंदे-फडणवीस सरकार वाचलेलं आहे. परंतु सरकरवर गंभीर ताशेरे ओढलेले आहेत.' यावर शेवाळे म्हणाले, "सरकार स्थापन होण्यामधल्या प्रक्रियेतील ज्या त्रुटी न्यायालयाने निदर्शनास आणून दिलेलं आहे. मात्र न्यायालयाने सरकारला मान्यता दिली आहे. न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे की, हे घटनेनुसार सरकार आहे."

"नाबाम रेबिया संदर्भ या प्रकरणात लागू होत नाही. न्यायालयाने भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवलेली नाही. फक्त प्रतोदपदी निवड करताना प्रक्रियेचे पालन केलेले नाही, असे म्हंटले आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भरत गोगावले यांची प्रतोदपदी नवीन प्रक्रिया सुरू करून पुन्हा निवड करू," असेही राहुल शेवाळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT