Abhijeet Dipke Sarkarnama
महाराष्ट्र

CJP News : "आता हेच जंतरमंतर!" महाराष्ट्रात अभिजित दीपकेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकारचे टेन्शन वाढले

Abhijit Dipke meets students News : येत्या काळात सरकार समोरील अडचणी वाढणार आहेत. दरम्यान, पोलिस अभिजीत दीपके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Sachin Waghmare

Chhatrpati Sambahjinagar News : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपीकपदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान गोंधळ उडल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी राज्यभर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. हा गोंधळ समजताच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, ते समजून घेतले.

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आयोजनासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावरच बसून अभिजीत दीपके यांनी आता हेच जंतर-मंतर असल्याचे सांगून नव्या आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे येत्या काळात सरकार समोरील अडचणी वाढणार आहेत. दरम्यान, पोलिस अभिजीत दीपके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

हायकोर्ट लिपीक पदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यभर मोठा गोंधळ उडल्याचे समोर आले. काही विद्यार्थ्यांनी दिपके यांच्याकडे परीक्षेवेळी आलेल्या अडचणीचा पाढाच दिपके यांच्यासमोर वाचला. त्यामुळे दिपके यांच्यासह विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा आयोजित केली जावी, ज्या तांत्रिक अडचणी आल्या, त्या भविष्यात यायला नकोत, अशा काही मागण्या विद्यार्थ्यांनी दीपके यांच्यापुढे मांडले.

यावेळी दीपके यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले तसेच आता येथेच आंदोलनाला बसायचे. जागेवरून उठायचं नाही, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. रविवारी पेपरवेळी आलेल्या अडचणीची दखल घेत अभिजीत दीपके यांनी थेट छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टाबाहेर ठिय्या मांडला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण जमा झाले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT