Pooja Khedkar News : अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे IAS केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने पूजा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे पूजा यांना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूजा यांच्यावर बनावट कागपत्रांद्वारे ओबीसी दाखल बनवल्याचा तसेच बनावट अपंगत्वाच्या दाखल्याद्वारे IAS केडर मिळवत यूपीएससीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
यूपीएससीकडून बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पूजा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होता. मात्र, न्यायालयाने पूजा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
न्यायालयाने जामीन फेटाळताना पूजा खेडकर यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. समाजातील वंचित घटकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याच्या हेतूने याचिकाकर्ता पूजा यांनी फसवणूक केल्याचे दिसत आहे. तसेच आलिशान कारचे मालक असलेल्या आणि सधन कुटुंबातून असतानाही कागदपत्रांमध्ये फेरफार करत फसवी प्रमाणपत्रे तयार केली हे तपासून दिसत असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले.
पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी IAS म्हणून रुजू होत्या. कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या अॅन्टीचेंबरला त्यांनी आपले कार्यालयच बनवले होते. तसेच आपल्या खासगी गाडीवर अंबरदिवा लावल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी सरकारकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या बनावट कागदपत्रांचे प्रकरण समोर आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.