महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी रविवारी घेतली जाणार असून परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने यंदा विशेष आणि काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये एकूण १,४२३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी टीईटीसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये पेपर एकसाठी २ लाख ३ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी, तर पेपर दोनसाठी २ लाख ७२ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होत असल्याने सुरक्षेची आणि पारदर्शकतेची अधिक काळजी घेतली जात आहे.
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण केंद्रात येऊ नयेत, यासाठी प्रत्येक केंद्रावर प्रवेशद्वारावर विद्यार्थी आणि परीक्षा कामकाजातील सर्व कर्मचाऱ्यांची हॅण्ड-होल्ड मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाणार आहे. कोणताही विद्यार्थी मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आत घेऊन जाऊ शकणार नाही. परीक्षेच्यावेळी कठोर नियमावली पाळली जाणार आहे.
विद्यार्थ्यांची छायाचित्रे, नाव आणि उपस्थिती यांची अचूक पडताळणी करण्यासाठी ‘फोटो व्ह्यू’ ही प्रणाली वापरली जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्र संचालक, संनियंत्रण कक्ष आणि राज्य परीक्षा परिषद यांना हॉटलाइन फोनद्वारे थेट संपर्कात ठेवले जाईल. यासाठी ‘कनेक्ट व्ह्यू’ ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. या माध्यमातून आवश्यक ती माहिती किंवा तातडीचा संदेश त्वरित पोहोचवला जाईल.
पेपर एकसाठी ५७१ आणि पेपर दोनसाठी ८५२ अशा मिळून सर्व केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षार्थीची बायोमेट्रिक नोंद घेण्यात येईल. त्याचबरोबर फेस रेकग्निशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ओळख तपासली जाईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी कोणताही धोका किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी सर्व व्यवस्था डिजिटल पद्धतीने नियंत्रित केली गेली आहे.
कडक नियम, डिजिटल व्यवस्था आणि सततच्या नियंत्रणामुळे यंदाची टीईटी परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडावी, असा राज्य परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.