NHAI new toll collection rules update Sarkarnama
महाराष्ट्र

Toll Price Hike: आजपासून राज्यातील हायवेचा प्रवास महागला, तुमच्या खिशाला लागणार मोठी कात्री! जाणून घ्या नवे दर

New toll rates in India from today: आजपासून हायवे टोल दर वाढले असून प्रवास महागला आहे. नवे टोल दर, प्रवाशांवर होणारा परिणाम आणि तुमच्या खिशावरचा ताण जाणून घ्या.

Rashmi Mane

Toll price hike in Maharashtra highways: प्रवास करताय आणि तो ही महामार्गावरून मग तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. आजपासून म्हणजेच १ एप्रिल पासून टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्यातील अनेक टोल नाक्यावर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

आजपासून महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोलच्या किंमतीत सरासरी तीन ते पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. 'एनएचएआय'च्या म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल किंमत वाढवली आहे.

राज्यातील सुमारे NHAIच्या 70 आणि MSRDC च्या 35 टोलनाक्यांवर ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे. कार जीप बस आणि ट्रक अशा सर्व वाहनांच्या टोलसाठी 3 ते 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

फास्टॅग अनिवार्य

याशिवाय आता टोलनाक्यांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करून 'कॅशलेस' वसुलीवर अधिक कडक भर दिला जाणार आहे. त्यामुळे केवळ फास्टॅग (FASTag) किंवा डिजिटल पेमेंटद्वारे टोल भरण्याची सक्ती आहे. त्यासोबत टोल नाक्यावर आता क्यूआर कोड लावण्यात येणार आहे.

हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर लगेच तुम्ही टोल भरु शकतात. मात्र जर तु्म्हा फास्टॅग ऐवजी यूपीआयने पेमेंट केलं तर तुम्हाला टोलच्या सव्वा पट रक्कम जास्त आकारली जाणार आहे. त्यामुळे फास्टॅगमध्ये पुरेसा बॅलेन्स नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम आहे का हे चेक करा.

काय आहेत नवे दर

ही दरवाढ राष्ट्रीय महामार्गांवर ही लागू करण्यात आली आहे. कार, जीप आणि हलक्या वाहनांपासून ते अवजड ट्रकपर्यंत सर्वांसाठीच टोलचे दर वाढले आहेत. सुधारित दरांनुसार, कार किंवा जीपसाठी आता एकेरी प्रवासाला 95 रुपये तर परतीच्या प्रवासासाठी 130 रुपये मोजावे लागणार आहेत. बस आणि ट्रकसाठी आता 315 रुपये मोजावे लागतील, तर मोठ्या अवजड वाहनांसाठी हा आकडा 545 ते 815 रुपयांच्या घरात गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT