Ias transfer Sarkarnama
महाराष्ट्र

IAS Transfers : मोठी बातमी! IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबई महापालिकेला मिळाले नवे अधिकारी तर धाराशिव, सांगलीमध्ये...

IAS Transfers Rubal Agrawal Nayana Gunde Ashok Kakade : महायुती सरकारने आठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी प्रियमवदा म्हाडदळकर यांची नियुक्ती झाली आहे.

Roshan More

IAS Transfers : राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेला नवे सहआयुक्त तर सांगलीला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक IAS रुबल अग्रवाल यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून नियुक्ती झाली आहे.

महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांची अमरावतीच्या विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून नियुक्ती झाली आहे.

राहुल रेखवार यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून नियुक्ती झाली आहे. तर, देवेंद्र सिंग मुंबई महानगरपालिकेत सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. तर प्रियंवदा म्हाडदळकर धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रियंवदा या मुळच्या रत्नागिरीच्या असून 2022 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रातून त्यांनी 13 वा क्रमांक मिळवला आहे.सांगलीच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती झालेले डॉ. मैनक घोष हे मुळचे पश्चिम बंगालचे असून 2019 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT