Sangli Collector: सांगलीला मिळाले नवे जिल्हाधिकारी; अत्यंत संवेदनशील अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र

Sangli Collector : सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांना संधी मिळाली आहे.
IAS Transfer Order
IAS Transfer OrderSarkarnama
Published on
Updated on

Sangli Collector Transfer : सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली करण्यात आली आहे. पदोन्नतीवर त्यांना महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर संधी मिळाली आहे. काकडे यांच्या जागी डॉ. मैनक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोष सध्या धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत आहेत.

मैनक घोष यांच्या जागी नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रियंवदा महाडळदकर यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंवदा या मुळच्या रत्नागिरीच्या असून 2022 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रातून त्यांनी 13 वा क्रमांक मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी येते आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे.

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती झालेले डॉ. मैनक घोष हे मुळचे पश्चिम बंगालचे असून 2019 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. गतवर्षी धाराशिव जिल्ह्यात महापूर आला असताना एक IAS अधिकारी कसा असावा याचं प्रत्यंतर मैनक घोष यांनी दिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मैनक घोष हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते.

IAS Transfer Order
BMC commissioner : BMC आयुक्तपदासाठी 7 ज्येष्ठ IAS अधिकाऱ्यांची फिल्डिंग : 80 हजार कोटी 'बजेटची' चावी कोणाच्या हाती जाणार?

बदली झालेल्या अशोक काकडे यांनी सांगलीतील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही प्रकल्प आखले. त्यातील काही प्रयोग यशस्वी केले. भविष्यात या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि सांगली अधिक विकसित, अधिक चांगली होईल, असा मला विश्वास आहे. सांगलीत काम करताना खूप समाधान वाटले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

IAS Transfer Order
IAS Officer News: एकेकाळी अजितदादांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेल्या 'आयएएस' अधिकाऱ्याची अचानक स्वेच्छानिवृत्ती, सरकारने आदेशही काढले

अशोक काकडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना कवलापूर विमानतळ विकास, ड्रायपोर्टसाठी जागेचा शोध, मिरज ते दिल्ली किसान रेलची योजना अशा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर काम केले. सांगलीला कृषी औद्योगिक विकासात सर्वाधिक संधी आहे. त्यादृष्टीने त्यांनी येथील शेतमालाला जागतिक बाजारात संधी मिळावी म्हणून निर्यातदार आणि शेतकरी यांच्यात संवाद कार्यक्रम प्रभावीपणे हाताळला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com