Narayan Rane -Ramdas Kadam

 

Sarkarnama

महाराष्ट्र

२००५ साली 'तो' फोन आला नसता तर 'रामदास कदम' आज काँग्रेसमध्ये असते...

Ramdas Kadam शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज आपली खदखद पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. या दरम्यान त्यांनी राज्याचे मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर अनेक आरोप केले. परब आणि कदम यांच्यामध्ये एका कथित ऑडिओ क्लिपमुळे वाद सुरू झाला होता. हा वाद आता टोकाला पोहोचला आहे. याच आरोपानंतर लवकरच आपण पुढचा निर्णय जाहीर करु असे कदम सांगितले आहे. त्यामुळे ते आता शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पण २००५ सालीच रामदास कदम शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये (Congress) जाणार होते. पण एका फोनमुळे ते शिवसेनेतच थांबले. त्याचा हा किस्सा स्वतः नारायण राणे (Narayan Rane) यांनी एके ठिकाणी सांगितला आहे. तसेच राणेंचे पुत्र निलेश राणे यांनीही हा किस्सा सांगितला आहे.

२००५ साली नारायण राणे तत्कानिल विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देवून शिवसेना सोडली. त्यांच्यासोबत काही आमदारांनीही शिवसेना सोडली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी सेनेतून राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांची यादी तयार करण्याचे काम चालू होत. त्यावेळी आमदारांच्या या यादीमध्ये रामदास कदमांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. याचे कारण म्हणजे त्यावेळीही सेनेत कदमांचीही घुसमट वाढतच चालली होती. अशात रामदास कदम यांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

यादी तयार झाल्यानंतर रामदास कदम राणेंच्या शासकीय बंगल्यातुन बाहेर पडले आणि नारायण राणेंना म्हणाले, "कि दादा मी खेडमध्ये जातो आणि कार्यकर्त्यांशी बोलतो. नंतर आपण बॉम्ब टाकुयात". कदम शासकीय बंगल्यावरून बाहेर पडले. पण नेमके त्याचवेळी कदम यांना मातोश्रीवरुन फोन आला आणि विरोधी पक्षनेते पद त्यांना घोषित झाले. या फोननंतर कदम महाडजवळून माघारी परतले आणि त्यांनी मातोश्रीवर जाऊन विरोधी पक्षनेते पद स्वीकारले. त्यानंतर ते २००९ पर्यंत कदम या पदावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT