Ramdas Kadam
Ramdas Kadamsarkarnama

कदमांची नाराजी उफाळून आल्यानंतर त्यांच्या पुढे आहेत हे ३ पर्याय...

रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मनातील खदखद आज जगासमोर आली.

मुंबई : शिवसेना नेते (Shiv Sena) रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मनातील खदखद आज जगासमोर आली. ऐकेकाळी शिवसेनेतील बड्या नेत्यांपैकी एक असणारे रामदास कदम (Ramdas Kadam) काही दिवसांपासून मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्यामुळे नाराज असल्याचे सांगितले जात होते. अखेर आज त्यांनी या नाराजीबाबत स्पष्टपणे बोलून दाखवले. यादरम्यान रामदास कदम यांनी या दोन्ही नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. आपले आणि आपल्या मुलाचे राजकीय करिअर संपवण्यासाठी प्रयत्न असल्याचा आरोप कदमांनी केला आहे.

हीच सगळी नाराजी आणि खदखद जगासमोर आल्यानंतर रामदास कदम यांचे पुढचे पाऊल नेमके काय असणार याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रामदास कदम यांच्यापुढे तीन पर्याय आहेत. एक तर या खदखदीनंतरही ते आणि त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांच्यासह शिवसेनेतेच राहणार. दुसरा पर्याय म्हणजे ते आणि त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांच्यासह सर्वजन भाजपवासी होणार.

Ramdas Kadam
अनिल परबांनी दाखवला वकिली बाणा

सध्या शिवसेना सोडणार नाही, अशी भूमिका रामदास कदम यांनी जाहीर केली आहे. पण, मुलांसाठी मार्ग मोकळा आहे. असेही ते म्हणाले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणजे ते शिवसेनेपासून बाजूला होणार आणि त्यांच्या मुलांचे राजकीय भविष्य भाजपमध्ये जाणार. आता या तीन पर्यांयांव्यतिरीक्त कदम आणखी कोणता चौथा मार्ग स्विकारतात का हे येणाऱ्या काळात समजून येईल.

Ramdas Kadam
रामदास कदम यांच्या सोबतच्या वादाला अनिल परब यांनी दिला तडका

परबांवर तुफान हल्लाबोल...

रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. 'अनिल परब शिवसेनेचे गद्दार आहेत. ते रत्नागिरीत शिवसेना, माझे आणि माझ्या मुलाचे राजकीय कारकीर्द संपवण्याचा घाट घालत आहे, रत्नागिरीचे पालकमंत्री असूनही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सोडता ते कधीही जिल्ह्यात येत नाहीत, त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नाही. ते रत्नागिरीतील मतदारसंघ आणि नगरपंचायती राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला. याच वेळी त्यांनी शिवसेना संपणाऱ्यांना आवरा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळकळीचे आवाहनही केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com