Nawab Malik

 

Sarkarnama

महाराष्ट्र

हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणा, म्हणजे आता आमच्या सोबत किती हे समजेल

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपने त्याचा स्वीकार करावा, असेही नवाब मलिक म्हणाले. (Nawab Malik)

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी विरुद्ध भाजप (Bjp) असा कलगितुरा रंगला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकारला आपल्याच आमदारांवर विश्वास नाही का? (Nawab Malik) असा चिमटा सरकारला काढला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणा, मग तुम्हाला समजेल असे प्रति आव्हान दिले होते.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील आता भाजपला खुले आव्हान दिले आहे. विधिमंडळ आवारात प्रसार माध्यमांशी बोलतांना मलिक यांनी सरकारवर भाजपने अविश्वास ठराव आणून दाखवावा, असे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे, त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा. म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहेत हे समजेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पारदर्शक पध्दतीने होत असेल तर भाजपने त्याचा स्वीकार करावा, असेही नवाब मलिक म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाचे बहुमत आमच्या सरकारकडे आहे.

विवेक बुद्धीने मतदान झाले पाहिजे असे भाजपच बोलत असेल तर संसदेत उघडपणे मतदान केले जाते, मग त्या खासदारांना विवेकबुद्धी नाही का? असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT