Congress and Shiv Sena Thackeray party Sarkarnama
महाराष्ट्र

Congress and Shiv Sena Thackeray party : महाविकास आघाडीत पहिली ठिणगी 'या' दोन पक्षात पडणार?

Possibility of dispute between Congress and Shiv Sena Thackeray over seat sharing : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची कोंडी केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा असला, तरी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कितपत पटेल, ही शंकाच आहे. या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर सर्वात अगोदर ठिणगी पडणार असल्याचे सांगितले जाते.

यातच सांगली लोकसभा निवडणुकीवरून झालेल्या वादावर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत गाठीभेटी घेऊन पडदा टाकला खरा! परंतु खासदार विशाल पाटील सांगलीत वेगळ्याच राजकीय खेळीत गुंतलेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे जागावाटप, सांगलीसह अनेक मुद्यांवर बिनसणार, असे दिसते.

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मित्रपक्षांची कोंडी केली आहे. मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा त्याला शिवसेना पक्षप्रमुख पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी तत्पूर्वी दिल्ली दौरा केला होता. तेथून आल्यानंतर मेळव्यातील उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि जागावाटपावर महाराष्ट्रातील काँग्रेसशी एकमत झाल्याचे दिसत नाही. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्रात सर्वाधिक 14 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला काँग्रेसने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने मुंबई, ठाणे आणि राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील जागांवर दावा केला आहे. तसा आग्रह धरला आहे. जागावाटपावरून अधिक वाद नको म्हणून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाला प्रत्येकी 100 जागा दिल्या जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विशाल पाटलांची तिरकी चाल

उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सांगलीबाबत तोडगा काढण्याची भूमिका घेतली. विशाल पाटील यांनी देखील विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द दिला. पण मतदारसंघात येतात विशाल पाटलांनी ठाकरे आणि महाविकास विरोधात भूमिका जाहीर घेतली. खासदार विशाल पाटलांनी महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला. आपण अपक्ष आहे, कोणाला घाबरत नाही, अशी भूमिका विशाल पाटील यांनी बोलावून दाखवली. त्यामुळे विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे विधानसभेतही, काँग्रेस-ठाकरे पक्षात जुंपणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पुन्हा भिडण्याची संकेत दिलेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT