Zeeshan Siddiqui : काँग्रेसने मला उमेदवारी मागणी अर्ज देण्यासही नकार दिला; झिशान सिद्दिकींचा आरोप

Jansanman Yatra : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीचे आज वांद्रे पूर्व मतदारसंघात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आमदार झिशान सिद्दिकी हे सहभागी झाले होते.
Zeeshan Siddiqui
Zeeshan SiddiquiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 19 August : काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी मागणीचा अर्ज देण्यासही ठाम नकार दिला आहे. म्हणजेच काँग्रेस पक्षाने मला नाकारले आहे, त्यामुळे मी कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवायची हे जनताच ठरवेल, असे आमदार झिशान सिद्दिकी यांनी सांगितले.

झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) हे काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर 2019 मध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व या मतदारसंघातून निवडून आले आहेत. दरम्यान, झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांचे नाव सध्या अजित पवार यांच्या गटातून राज्यसभेसाठी चर्चेत आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीचे आज वांद्रे पूर्व मतदारसंघात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आमदार झिशान सिद्दिकी हे सहभागी झाले होते. काँग्रेसचे आमदार असूनही राष्ट्रवादीच्या (NCP) रॅलीतील सहभागाबाबत विचारले असता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात येतात म्हटल्यावर मी त्यांचे स्वागत करणे आवश्यक आहे, त्यांच्या स्वागतासाठी मी रॅलीत सहभागी झालो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Zeeshan Siddiqui
Ajit Pawar : बारामतीत रस नाही म्हणणाऱ्या अजितदादांना शिरूरमधून लढण्याचे निमंत्रण; पवारांनी काय दिले उत्तर?

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने दोन दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व मतदारसंघात रॅली काढली होती. मात्र, त्या रॅलीला स्थानिक आमदार असूनही मला काँग्रेसच्या नेत्यांनी बोलावले नव्हते. कदाचित त्यांची स्मरणशक्ती थोडी कमी असेल, त्याबाबत मी काही करू शकत नाही.

काँग्रेस पक्षाकडून नुकतेच उमेदवारी मागणी अर्ज वाटप करण्यात येत होते. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागणारा अर्ज घेण्यासाठी मी माझा प्रतिनिधी काँग्रेस भवनात पाठवला होता. मात्र, मला उमेदवारी मागणीचा अर्ज देण्यास नकार देण्यात आला. म्हणजेच मला काँग्रेसने नाकारले आहे, असेही झिशान सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.

Zeeshan Siddiqui
Devendra Fadnavis : शिवसेना नेत्यावर देवेंद्र फडणवीस नाराज; एकनाथ शिंदेंशी बोलण्याचा गर्भित इशारा

काँग्रेसने जरी मला नाकारले असले तरी वांद्रे पूर्व मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे. ही जनताच मी कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवायची हे ठरवेल, असेही आमदार सिद्दिकी यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com