devendra fadnavis- uddhav thackeray
devendra fadnavis- uddhav thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

सीएम कार्यालय : फडणविसांकडे वर्षाला आठ हजार, तर ठाकरेंकडे अडीच हजार फाईल्स

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अनुपस्थितीमुळे त्यांच्याकडील फाईल्सचा भार चांगलाच कमी झाल्याचे चित्र आहे. अधिकारांच्या विकेंद्रीकरणामुळे त्या-त्या संबंधित कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या खात्यांचे सर्वाधिकार मिळाले आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, त्यामुळे केवळ अतिमहत्त्वाच्या किंवा धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या फाईल्सच मुख्यमंत्री कार्यालयात पाठवल्या जात आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचाही शब्द अंतिम मानला जात असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुरुवातीपासूनच सामान्य प्रशासन वगळता नगरविकास, गृह यांसारखी महत्त्वाची खाती आपल्याकडे न ठेवता ती एकनाथ शिंदेंसारख्या त्यांच्या विश्वासू शिलेदारांकडे सोपविली. इतकेच नाही तर सर्व अधिकार आपल्याकडे न घेता त्या त्या खात्याच्या मंत्र्यांकडे सोपिवले. परिणामी सर्व फाईल्स आता मुख्यमंत्री कार्यालयात न येता त्या फाईल्सचा कॅबिनेट मंत्र्यांच्या स्तरावरच निपटारा केला जातो. त्यामुळे २ वर्षाच्या कारकिर्दीत केवळ ५ हजार फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात आल्या आहेत.

याशिवाय आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या व बढत्यांच्या फाईल्सही संकेतांप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयात येणे अपेक्षित असते. सोबतच सर्वच खात्यांच्या इतर अधिकार्‍यांच्या मुदतपूर्व बदल्यांचीही फाईल नियमाप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयात आली पाहिजे. पण मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यामुळे याबाबतच्या अनेक फाईल्स कॅबिनेट मंत्र्यांच्या स्तरावरच मंजूर होत असल्याचे सध्या दिसून येते. जे की नियमानुसार त्यांना मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणे आवश्यक आहे.

त्या तुलनेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना कटाक्षाने येणारी फाईल नजरेखालून घालायचे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल ३८ हजार फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात आल्या होत्या. त्यातील ९० टक्के फाईल्स फडणवीसांनी हातावेगळ्या केल्या होत्या. तर त्यापुर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतही मुख्यमंत्री कार्यालयात फाईल्सचा राबता असायचा. पण ते या फाईल्स हातावेगळ्या करताना काहीसा वेळ घ्यायचे, त्यामुळे फाईल्स साचल्या होत्या, असे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT