आव्हाड संतापले; मी घरी जाऊन लोकांचे tv बंद करू का?

Why i killed gandhi : कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच (NCP) विरोध
Amol Kolhe,Jitendra Awhad
Amol Kolhe,Jitendra Awhadsarkarnama

मुंबई : शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची (Nathuram Godase) भूमिका केली आहे. यावरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हेंवर काही जणांनी टीका करत विरोध करत आहेत, तर, काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. याच वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Sharad Pawar React on Amol Kolhe)

मात्र शरद पवार यांच्या या भूमिकेनंतरही कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच (NCP) विरोध होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कोल्हे यांना तीव्र विरोध केला आहे. ते म्हणाले, कलाकार आणि माणूस म्हणून या दोन वेगवेगळ्या भूमिका असूच शकत नाही. एखाद्या माहित नसलेल्या चित्रपटामध्ये माहित नसलेला खलनायक साकारणे ही एक वेगळी गोष्ट आहे. पण महात्मा गांधी आणि नथुराम या दोघांचीही चारित्र्य सर्वांना माहित आहेत. ज्यावेळी तुम्ही नथुराम साकारता त्यावेळी त्याला तुमच्यामध्ये आणता ना? तुम्ही गांधीवर गोळ्या झाडणार ना? त्यामुळे नथुरामचा जो कोणी उदात्तीकरण करेल त्याच्या विरोधात मी असेनच असे त्यांनी स्पष्ट केले.

Amol Kolhe,Jitendra Awhad
पवारांच्या मताशी 'काँग्रेस' असहमत; कोल्हेंचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा

तुमचा विरोध कशाप्रकारे असेल या प्रश्नावर उत्तर देताना आव्हाड संतापून म्हणाले, तो OTT प्लॅटफॉर्म आहे. आता काय लोकांचे घरात जावून टिव्ही फोडू का? माझा विरोध हा वैचारिक पातळीवर आहे आणि तो तुमच्या समोर आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबतीत पक्षाचा काहीही संबंध नाही असेही आव्हाडांनी स्पष्ट केले. मला पक्षाने कधीही पुरंदरेंच्या विरोधात बोला असे सांगितले नव्हते. मी जेव्हा शरद पोंक्षे यांचे नाटक उधळले, तेव्हाही पोंक्षे आणि विनय आपटे शरद पवारांकडे गेले होते. तेव्हा त्यांनी देखील दोघांना स्पष्ट सांगितले, पक्षाचे याच्याशी काहीही घेणे-देणे नाही, ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे. त्यामुळे तु माघार घे म्हणून आम्हीही त्याला सांगू शकत नाही.

Amol Kolhe,Jitendra Awhad
अमोल कोल्हेंवर जितेंद्र आव्हाड संतप्त ; नथुरामाची भूमिका स्वीकारणं हे चुकीचं

नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. तो उभ्या आयुष्यात पुसता येणार नाही. जेव्हा - जेव्हा नथुरामाचे नाव निघेल तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राचे नाव निघेल. त्या डागाला आपण आणखी गडद कसा होतोय हे पाहणं, हे महाराष्ट्रात होताच कामा नये. अमोल कोल्हे आणि माझं बोलणं, त्यांनी मला समजावलं की हे २०१७ मध्ये झालेले शुटिंग आहे, तेव्हा मी त्यात काम केले होते. पण मी देखील त्यांना स्पष्टचं सांगितले की मी माझी भूमिका बदलणार नाही. मी शरद पोक्षेंना विरोध केला आहे, विनय आपटेला विरोध केला, असे आपण कोल्हे यांना स्पष्ट केले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com