Farmers Leader Raju Shetty-Minister Abdul Sattar Sarkarnama
महाराष्ट्र

Raju Shetti Met Abdul Sattar : एकाच भेटीत प्रश्न मार्गी, राजू शेट्टी म्हणाले, अब्दुल सत्तारांना शेतकऱ्यांबद्दल तळमळ..

Jagdish Pansare

Swabhimani Shetkari Sanghatana News :स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना काही प्रश्न तातडीने मार्गी लागले. यात शेतकऱ्यांकडे असलेले जुने-नवे अद्रक सरसकट खरेदी करण्याचा निर्णय पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिला.

जुन्या-नव्या अद्रकातील दराची तफावत या बैठकीत दूर करण्याचा निर्णय झाला असून आता सरसकट अद्रक खरेदीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले. राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी अद्रक, मिरची, कापूस, मका, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राज्यात परंपरागत पद्धतीने जुने आणि नवीन अशी तफावत न करता अद्रकची (आले) सरसकट खरेदी-विक्री करण्यात यावी, असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी राज्यातील बाजार समितीला दिले आहेत.

यासाठी तातडीने शासन निर्णय जारी केल्या जातील, असे स्पष्ट करीत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याऱ्या बाजार समिती, व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा सत्तार (Abdul Sattar) यांनी बैठकीतच दिला. राज्यातील अद्रक व इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर राजू शेट्टी यांनी बैठकीत सत्तार यांच्याशी चर्चा केली.

खरेदी विक्रीत होणारी तफावत, जुना नवा शेतमाल यावरून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक यावर मार्ग काढण्याची मागणी शेट्टी यांनी केली. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी - शेतमजुरांना केंद्रबिंदू मानून वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल त्यांनी बांधावर अथवा बाजारात विकावा यासाठी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य असेल, अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी बैठकीत दिली. अब्दुल सत्तार यांनी तातडीने दखल घेत याबाबत पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या. तसेच याबाबत तातडीने शासन निर्णय घेवून त्याची प्रत लवकरच देणार असल्याचा शब्द दिला. यावरून त्यांची शेतकऱ्यांनाद्दलची तळमळ दिसून आली, असे म्हणत राजू शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT