Abdul Sattar : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण? मंत्री म्हणतात 'बिबट्या'

Abdul Sattar Shivsena : बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम वन विभागाचे अधिकारी करत आहेत, असे सत्तार म्हणाले. शहरात दिसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी 6 पथकं, 100 कर्मचारी, एक गनमॅन दोन आठवड्यापासून बिबट्याचा शोधात आहेत.
abdul sattar
abdul sattarsarkarnama
Published on
Updated on

Abdul Sattar News : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण? याचे उत्तर शालेय विद्यार्थी देखील देतील मात्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रि‍पदावर असलेल्या मंत्र्याला आपला राष्ट्रीय प्राणीच माहीत नसल्याचे दिसते आहे. या मंत्र्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मंत्री राष्ट्रीय प्राणी म्हणून चक्क बिबट्याचा उल्लेख करताना दिसतात.

संभाजीनगरचे पालकमंत्री, अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचे म्हटले आहे.

बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याला सुरक्षित ठेवण्याचे काम वन विभागाचे अधिकारी करत आहेत, असे सत्तार म्हणाले. संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. शहरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत.

शहरात दिसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी 6 पथकं, 100 कर्मचारी, एक गनमॅन दोन आठवड्यापासून बिबट्याचा शोधात आहेत. पालकमंत्री सत्तार यांनी बिबट्याला तीन दिवसात पकडण्याचे आदेश दिलेत. तसेच लवकरात लवकर बिबट्याला जंगलात सोडण्यात येईल, जेणेकरून तो सुरक्षित राहील, असे देखील म्हटले आहे.

शहराला दररोज पाणी मिळणार

संभाजीनगर शहराला दररोज कमीत कमी तीन तास पिण्याचे पाणी मिळायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला 135 लिटर याप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी पुढील 90 दिवसांत खारीचा वाटा उचलून संभाजीनगरची पाणी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com