Income Tax: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. या नोटिशीला दोघेही उत्तर देणार आहेत. शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्याला आणि श्रीकांत शिंदेंना नोटीस आल्याची जाहीररित्या कबूल केलं आहे. त्याचबरोबर "आता ब्लॅकचा पैसा चालणार नाही", अशा शब्दांत त्यांनी यावर कोटीही केली, त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
शिरसाट म्हणाले, आता यापुढं ब्लॅकचे पैसे चालणारच नाहीत. हे मी फक्त माझ्यासाठी बोललो. मी हे उगाच नाही बोललो परवाच मला नोटीस आलेली आहे. २०१९ च्या निवडणुकीत तुमची प्रॉपर्टी इतकी होती ती २०२४ मध्ये एवढी कशी झाली? असं या नोटिशीत म्हटलं आहे. येणाऱ्या ९ तारखेला या नोटिशीला उत्तर द्यायचं आहे. पैसे कमावणं सोपं आहे पण ते वापरणं अवघड झालेलं आहे. त्यानंतर सीए पाटलांना फोन केला आणि ती नोटीस आली आहे, ते पाहुन घ्या असं त्यांना सांगितलं.
पुढे माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, "आयकर विभाग सर्वांची पडताळणी करतं, मला नोटीस आली, श्रीकांत शिंदेनाही नोटीस आली. तसंच इतर अनेकांना नोटिशी येतात. यानंतर आयकर विभागाला आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आयकर विभागानं ९ तारखेपर्यंत मला नोटिशीला उत्तर द्यायला सांगितलं होतं, पण मी त्यांना वेळ वाढवून मागितली आहे. याला आम्ही उत्तर देणार आहोत"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.