दिलीप पाटील
Wada News : वाडा शहरातील नावलौकिक असलेल्या 'दिलीप ट्रेडर्स 'या फटाका व्यापाऱ्यावर गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई आयकर विभागाने धाड टाकली होती. या दुकानाची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. त्यामुळे या धाडीविषयी जोरदार चर्चा होती. या धाडीत नेमके काय सापडले याविषयी देखील तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र, सत्य अखेर समोर आले आहे.
आयकर विभागाला या धाडीत काहीही मिळाले नसून धाडीच्या तिसऱ्या दिवसापासूनच दुकना सुरळितपणे सुरू करण्यात आले असल्याची माहिती दुकानाचे मालक दिलीप पातकर यांनी दिली आहे.
वाडा शहरात दिलीप ट्रेडर्स नावाचं फटाका व्यावसायिक असून येथे वर्षभर फटाक्यांची विक्री होत असते.दिवाळी सणात तर हे दुकान रात्र दिवस सुरू असते.येथे फटाका घेण्यासाठी ठाणे, पालघर, नाशिक, मुंबई आदी भागातून व्यापारी येत असतात.
वाडा शहरातून कोणीतरी या दुकान संदर्भात तक्रार दिल्ली येथे केली होती.दिल्ली आयकर विभागाने ही तक्रार मुंबई कार्यालयाकडे पाठवली असता मुंबई कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 70 कर्मचाऱ्यांसह येथे धाड टाकली. त्यानंतर दि.12 व 13 फेब्रुवारी अशी सलग दोन दिवस दुकान, गोडाऊन व घरी अशी चौकशी केली असता आयकर विभागाला काहीही सापडले नाही अखेर त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागले. त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून दुकान सुरळितपणे सुरू आहे.
आम्ही करचुकवेगिरी करीत नाहीत तसेच वेळेवर कर भरीत आहोत.जीएसटी आयकर नियमितपणे व वेळेवर भरत असल्याचे सर्व पुरावे आम्ही संबंधित आयकर अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती दुकानाचे मालक दिलीप पातकर यांनी दिली. काही विघ्न संतोषी, प्रतिस्पर्धींनी आमच्या अशा खोट्या नाट्या तक्रारी करून नाहक त्रास देऊन बदमानीचा प्रयत्न केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.