

छत्रपती संभाजीनगर येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील ५ हजार १२ अध्यापक पदांना मंजुरी दिल्याची घोषणा केली.
विद्यापीठांमधील ६०० प्राध्यापक पदे देखील भरण्यात येणार असून जूनपर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या संस्थांची पदे इतर संस्थांकडे वर्ग केली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी २०२०) प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या धोरणानुसार राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या अध्यापकांच्या ५ हजार १२ जागा भरण्यास राज्य शासनाने मंजुरी देण्यात आली आहे. जी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील आहेत.
तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांची सहाशे पदे भरणार भरली जाणार असून ही पदे भरण्यासाठी जूनपर्यंतची डेडलाइन असेल असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी, ज्या संस्था पदभरतीस दिरंगाई करतील ती पदे इतर संस्थांकडे वर्ग करू, असाही दम भरला आहे.
राज्य शासनानं सहाय्यक प्राध्यापकपदांच्या भरतीला मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांमधली पदं भरली जात नव्हती.
मात्र आता या भरती प्रक्रियेला वेग देण्यात आला असून शासनानं भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. राज्यभरात तब्बल रिक्त असलेल्या अध्यापकांच्या ५ हजार १२ जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान, आता याबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, की गुणवत्ता वाढीसाठी प्राध्यापक पदभरती महत्त्वाची आहे. पुढील शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होण्यापूर्वी ही भरती होऊन ते नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपलब्ध असतील, अशा पद्धतीने नियोजन करत आहोत. त्या दृष्टीने कालबद्ध पद्धतीने नियोजन करून जागा न भरणाऱ्या महाविद्यालय, संस्थांच्या जागा इतर महाविद्यालयांकडे देवू.
येत्या चार-पाच दिवसात महाविद्यालयांच्या जागा वाटपाचे सुत्र जाहीर होईल. त्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या निश्चितीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. काही विषयांना विद्यार्थी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यावर मार्ग काढला जात असून लवकरच घोषणा होईल. त्यानंतर तत्काळ जागा भरण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून ना हरकत देण्यास सुरूवात करू.
विद्यापीठातील रिक्त संवैधानिक पदे भरण्याचे आदेशही संबंधित विद्यापीठांना दिले आहेत. प्राध्यापक भरतीचे ६० : २० : २० चे सूत्र खूप विचारपूर्वक ठरवल्याचे ते म्हणाले. तसेच या निर्णयाला न्यायालयात आव्हानाच्या शक्यतेवर ते म्हणाले, मी आतापर्यंत एकही केस हरलेलो नाही. त्यामुळे ही सुद्धा केस जिंकेल.
1. किती अध्यापक पदांना मंजुरी देण्यात आली आहे?
राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील ५ हजार १२ अध्यापक पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
2. विद्यापीठांमध्ये किती प्राध्यापक पदे भरली जाणार आहेत?
सुमारे ६०० प्राध्यापक पदे भरण्यात येणार आहेत.
3. भरतीची अंतिम मुदत काय आहे?
जूनपर्यंत ही पदे भरण्याची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे.
4. दिरंगाई करणाऱ्या संस्थांवर काय कारवाई होईल?
भरती न करणाऱ्या संस्थांची पदे इतर संस्थांकडे वर्ग केली जाऊ शकतात.
5. ही घोषणा कोणी केली?
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.