INDIA Alliance Marches Against Election Commission sarkarnama
महाराष्ट्र

India Alliance Protest : निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा मोर्चा; 'मत चोरी' विरोधात एल्गार, 300 खासदार, 25 पक्ष रस्त्यावर उतरले!

INDIA Alliance Marches Against Election Commission : निवडणूक आयोग भाजपला मदत करून मत चोरी करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. इंडिया आघाडी आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

Roshan More

Vote Theft Allegations : राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांमध्ये घोळ असून 'मत चोरी' होत असल्याचा आरोप केला होता. इंडिया आघाडीच्या बैठकीत मत चोरीबाबत एकमत झाले होते. आज (सोमवारी) मत चोरीच्या निषेधार्थ तसेच कारवाईसाठी इंडिया आघाडीकडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

तब्बल 300 खासदार आणि 25 राजकीय पक्ष यामध्ये सहभागी होणार आहेत. संसद भवन ते निवडणूक आयोगाचे कार्यालय असा हा पायी मोर्चा असणार आहे. मत चोरी आणि बिहारमधील मतदार पुनर्रनिरक्षण (एआयआर)च्या विरोधात हा मोर्चा असणार असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे.

दरम्यान, या मोर्चाच्या आधीच निवडणूक आयोगाच्या सचिवालयाकडून काँग्रेस खासदार जयराम रेमश यांना पत्र पाठवून भेट तसेच चर्चेसाठी दुपारी 12 वाजता निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या पत्रात म्हटले आहे की बैठकीत 30 लोक सहभागी होऊ शकतात.

मोर्चाला पोलिसांची परवानी नाही...

संसदभवनपासून निघणार या मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचे काही मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. निवडणूक आयोग सरकारचे हस्तक बनून काम करत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आम्ही रस्त्यावर उतरू काय करतील तर आम्हाला अटक करतील. जेलमध्ये टाकतील आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत.सर्व खासदार देशाचे लक्ष वेधणार असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT