HMPV virus India : चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या बातमीने लोकांच्या कोरोना (Corona) महामारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अशातच आता HMPV व्हायरसने भारतातील काही राज्यांमध्ये शिरकाव केल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं आलं होतं. त्यानंतर कर्नाटकातही 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलाला या व्हायरसने बाधा झाल्याचे निदान झालं होतं. अशातच महाराष्ट्रातील नागपुरातही (Nagpur) एचएमपीव्ही व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत.
खासगी रुग्णालयामध्ये केलेल्या टेस्टमध्ये दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, ही दोन्ही मुलं सध्या बरी झाल्याची माहिती आहे. कोरोना नंतर HMPV व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे.
अशातच आता या व्हायरसने चक्क नागपूरमध्ये एन्ट्री केली असून या विषाणूचे दोन रूग्ण आढळल्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. मात्र, त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज पडली नाही. शिवाय आता ते दोघेही ठणठणीत बरे झाल्याची माहिती आहे.
मात्र, आता या सगळ्या संदर्भात शासकीय लॅबमधून जीनोम सिक्वेन्सींग केलं जाणार आहे. त्यानंतरच हे रुग्ण HMPV आहेत का नाही? हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान HMPV व्हायरसपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाय योजना काय? असा सवाल करत मुंबई (Mumbai) हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकील श्रीरंग भांडारकर यांनी याचिका दाखल केली आहे.
राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या वेळी सज्ज नव्हती, परिणामी सर्वत्र हाहाकार माजला होता, हजारो नागरिकांचा करुणामुळे मृत्यू झाला होता. कोरोनासारखीच परिस्थिती HMPV च्या निमित्ताने ओढवू नये. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला निर्देश देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.