NCP leader Sharad Pawar shares his first official response after the India-Pakistan ceasefire announcement, emphasizing peace and dialogue.  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar reaction : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar reaction on India Pakistan ceasefire : भारतीय सैन्याचे रौद्ररूप बघून घाबरलेल्या पाकिस्तानला अखेर गुडघे टेकवावे लागले आहे.

Mayur Ratnaparkhe

Sharad Pawar’s First Reaction on Indo-Pak Ceasefire: भारत पाकिस्तानमधील या युद्धविरामाच्या घोषणेवर आता राष्ट्रवादी काँग्रस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलरवरून सांगितले आहे की, ‘’भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती.’’

तसेच, ‘’पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं. जय हिंद!’’ असं शरद पवार म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये २६ भारतीय पर्यटक आणि एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले, प्रकरण एवढे तापले की दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.

सुरुवातीला भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूर राबवून जबरदस्त प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील एकूण नऊ दहशतवादी ठिकाणं उध्वस्त केली. भारताची ही कारवाई केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करून केली गेली होती. मात्र तरीही पाकिस्तानकडून नंतर कुरापती सुरू झाल्या आणि भारतावर ड्रोन व मिसाईलद्वारे हल्ले केले गेले. अखेर संयमाची भूमिका घेणाऱ्या भारताने मग पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे ठरवले व प्रत्युत्तरात धडाकेबाज कारवाई सुरू केली.

भारतीय सैन्याचे रौद्ररूप बघून घाबरलेल्या पाकिस्तानला अखेर गुडघे टेकवावे लागले. भारसोबत शस्त्रसंधीसाठी मग त्यांनी अमेरिकेला गळ घातली, मात्र भारतानेही मग आपल्या अटी, शर्तींवरच शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आणि अखेर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. यानंतर मग दोन्ही देशांकडूनही याला दुजोरा दिला गेला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT