
Background of India-Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तानमध्ये आज सांयकाळी पाच वाजेपासून शस्त्रसंधी लागू केली गेली आहे. यामुळे आता दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले हल्ले-प्रतिहल्ले पूर्णपणे थांबवले गेले आहेत. मात्र भारताने आपल्या अटी आणि शर्तींवर ही शस्त्रसंधी लागू करण्यास तयारी दर्शवली आहे. तर पाकिस्ताने भारताच्या आक्रमकतेला घाबरून शस्त्रसंधीसाठी विनंती केली होती.
विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे शस्त्रसंधीमध्ये एकमत घडवण्यात अमेरिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
खरंतर पाकिस्तानची सिंधु करार स्थगितीमुळे कोंडी झाली होती, वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांचेही प्रचंड हाल सुरू झाले होते, भारतीय लष्कराच्या आक्रमक हल्ल्यांमुळे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे कोलमडली होती, शिवाय पाकिस्तानचे पाच एअर बेस बेचिराख झाले होते. त्यामुळे प्रचंड भेदरलेल्या पाकिस्तानने अमेरिकेला शस्त्रसंधीसाठी भारताला मनवण्याची विनंती केली होती. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या कायम संपर्कात होते, त्यांनी रात्रभर अमेरिकेने दोन्ही देशांशी चर्चा केली. यादरम्यान भारताने काही अटी आणि शर्ती टाकल्या होत्या.
शिवाय आजही भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते की, यापुढे जर कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला, तर ते भारताविरोधात युद्ध मानले जाईल आणि त्याला त्यानुसारच प्रत्त्युतर दिलं जाईल. केवळ शस्त्रसंधीवर एकमत झालेलं आहे मात्र पाणी आणि व्यापाराबाबत भारताने आपलं कडक धोरण कायम राखलं आहे.
तर, भारतीय तिन्ही सैन्यदलाच्यावतीने पत्रकारपरिषद आज पुन्हा एकदा पत्रकारपरिषद घेत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे. भारताच्या तिन्ही सैन्य दलाच्या पत्रकारपरिषदेत सांगितले गेले की, पाकिस्तनाने केलेले दावे खोटे आहेत. पाकिस्तानने जीएफ 17 आणि ब्रम्होस मिसाईल पाडल्याचा दावा केला आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहेत. पाकिस्तानकडून दावा केला गेला आहे, की भारताने मशिदींवर हल्ले केले आहेत, हे देखील पूर्णपणे खोटे आहेत.
याशिवाय, श्रीनगनर, जम्मू, पठाणकोटमध्ये भारताचे मोठे नुकसान केल्याचेही पाकिस्तान सांगत आहे परंतु असे काहीही झालेले नाही. पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम, रडार सिस्टम भारताने निष्प्रभ ठरवले होते. शिवाय पाकिस्तानचे अनेक एअरबेसही उध्वस्त केले. भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे फार मोठे नुकसान झाले आहे. भारतीय सैन्य पूर्णपणे सक्षम आणि सतर्क आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.