Monsoon Session News : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. त्यांनी माझ्याकडे हात जोडून विनंती केली होती, पण आम्ही त्यांना मदत करु शकलो नाही. एक मराठी तरुण ज्याने आपल्या कामाने जगात ओळख निर्माण केली, हजारो हातांना काम दिले, त्याच्यावर मृत्यूला कवटाळायला लावण्याची वेळ कुणी आणली? देसाई यांचे कर्ज किती होते, त्यांना वसुलीसाठी कसा त्रास दिला गेला, नोटीस कशा पाठवल्या या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे.
शंभर कोटी रुपयांसाठी देसाई यांचा बळी घेणाऱ्या संबंधित फायनान्स कंपनीवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी (BJP) भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधान परिषदेत केली. देसाई यांनी आत्महत्या करण्यापुर्वी रेकाॅर्ड केलेल्या आॅडिओमध्ये एनडी स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेऊन मराठी कलाकारांसाठी मोठा कलामंच उभारावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तेव्हा राज्य सरकारने हा स्टुडिओ ताब्यात घ्यावा, असेही दरेकर म्हणाले.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक प्रतिक्रिया या घटनेसंदर्भात उमटत आहेत. (Monsoon Session) प्रवीण दरेकर यांनी या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अनेक गाजलेले चित्रपट आणि त्यात त्यांनी उभारलेले सेट यामुळे नितीन देसाई यांचे नाव सातासमुद्रापलिकडे पोहचले होते. (Maharashtra) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या शपथविधीसाठी २० तासांत त्यांनी सेट उभारला होता. मोठ्या हिंमतीने मुंबईत येवून त्यांनी आपले साम्राज्य उभे केले होते.
परंतु मंगळवारी दिल्लीतून परतल्यानंतर त्यांनी आपल्या एनडी स्टुडिओमध्ये मृत्यूला कवटाळले. एका मराठी तरुणाला आम्ही वाचवू शकलो नाही. ते माझ्याकडे आले होते, दीडशे कोटीच त्यांच कर्ज होतं. आमच्या मुंबई बॅंकेत दोन-तीन बैठका झाल्या, पण त्यांच अकाऊंट एनपीएमध्ये होतं. आमचा तेवढा अवाका नव्हता, १० -१५ कोटींचा विषय असतात तर त्यांना मदत करता आली असती. त्यांचा जीव वाचवण्याचे भाग्य मिळाले असते, पण त्यांना वाचवू शकलो नाही याचे शल्य आयुष्यभर मनात राहील, अशा शब्दात दरेकर यांनी खंत व्यक्त केली.
देसाई यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना देखील बोललो होतो. देसाई संकटात आहेत, आर्थिक विवंचनेशी झुंजत होते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देसाई यांनी राजस्थानचे मोठे काम मिळाले होते. परंतु कर्ज वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू झाली आणि हा मराठी तरुण खचला. त्यांनी आत्महत्येपुर्वी रेकाॅर्ड केलेल्या ११ क्लीपस् या मन सुन्न करणाऱ्या आहेत. १५० कोटीचे कर्ज त्यावर व्याजावर व्याज लावून देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं.
जप्तीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलले. तडजोडीचे प्रयत्न केले होते, पण शंभर कोटींसाठी देसाईचा बळी गेला. असे अनेक देसाई या विंवचनेतून जात आहेत, त्यांना वाचवणे हे सरकारचे काम आहे. एनडी स्टुडिओच्या माध्यमातून हजारो लोकांना काम मिळाले. देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांची कुटुंब देखील उघड्यावर आली आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
मला वाचवा अशी हात जोडून ते विनंती करत होते. पण त्याला वाचवू शकलो नाही, याची सल कायम मनात राहिल. मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. टाॅपअप लोन देण्याचाही प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही, हे सांगतांना दरेकरांचे डोळे पाणावले होते.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.