Parbhani Shasan Aplya Dari News: पंच्याहत्तर हजार नागरिकांना लाभ देण्यासाठी १२ ऑगस्टला परभणीत `शासन आपल्या दारी`..

Eknath Shinde News : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन.
Shasan Aplya Dari,Parbhani News
Shasan Aplya Dari,Parbhani NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada News : परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित १२ ऑगस्टला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.

Shasan Aplya Dari,Parbhani News
Mahajan-Khadse News : मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच, तुमची अवस्था काय ? ते बघा ; खडसे-महाजन पुन्हा भिडले..

राज्य सरकारच्या विविध योजना लाभाथ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Maharashtra) त्यानिमित्ताने १२ ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदे परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

परभणी (Parbhani) येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Marathwada) या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

"शासन आपल्या दारी" या कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणून नागरिकांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. "शासन आपल्या दारी" अभियानातून जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार नागरिकांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com