Rupa Moudgil IPS Officer Sarkarnama
महाराष्ट्र

IPS Rupa Moudgil : तुकाराम मुंढेंपेक्षाही चर्चेत ‘लेडी सिंघम’! 20 वर्षांत 40 बदल्या; थेट मुख्यमंत्र्यांवर केली होती कारवाई

Rupa Moudgil IPS Officer: रूपा मौदगिल यांची ओळख केवळ वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नाही, तर प्रत्येक ठिकाणी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे झाली आहे.

Mangesh Mahale

IPS Officer Rupa Moudgil: सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या कामाची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत असून, प्रशासनात कडक अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांच्या प्रशासकीय सेवेत आतापर्यंत अनेकदा बदल्या झाल्याचाही मुद्दा चर्चिला जातो.

बदलीच्या आकडेवारीचा विचार केला तर रूपा मौदगिल यांची कारकीर्द आणखी वेगळी ठरते. तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत २५ बदल्या झाल्याची चर्चा असताना, रूपा मौदगिल यांच्या सुमारे २० वर्षांच्या सेवाकाळात तब्बल ४० बदल्या झाल्याचे सांगितले जाते.

आपल्या कडक आणि बेधडक कार्यपद्धतीमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी रूपा मौदगिल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रूपा मौदगिल यांच्या कारकिर्दीत तब्बल ४० वेळा बदली झाल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली, तेथे त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत कोणतीही तडजोड केली नाही.

एकाच ठिकाणी जास्त काळ राहता आले नाही

रूपा मौदगिल यांची ओळख केवळ वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नाही, तर प्रत्येक ठिकाणी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे झाली आहे. त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अल्प कालावधीतच बदली झाली. काही ठिकाणी त्या सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ राहू शकल्या नाहीत.

मात्र, बदली झाली म्हणून त्यांच्या कामाच्या शैलीत बदल झाला नाही. ज्या विभागाची किंवा परिसराची जबाबदारी मिळाली, तेथे त्यांनी कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कठोर पावले उचलली. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा केवळ कर्नाटकातच नव्हे, तर देशभरात झाली.

थेट मुख्यमंत्र्यांवरही कारवाईचा ठसा

रूपा मौदगिल यांच्या कारकिर्दीतील काही प्रसंग आजही चर्चेत आहेत. त्यांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्याविरोधात कारवाई करत अटक केली होती. त्यामुळे त्यांच्या धाडसी कार्यपद्धतीची देशभरात चर्चा झाली.राजकीय दबाव असो किंवा प्रशासनातील अडचणी, आपल्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली. याच कारणामुळे त्यांच्या बदल्याही अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या.

2000 बॅचच्या IPS अधिकारी

रूपा मौदगिल या कर्नाटक कॅडरच्या २००० बॅचच्या IPS अधिकारीआहेत. सेवेत दाखल झाल्यापासूनच त्यांनी आपल्या आक्रमक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीची छाप पाडली.

गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करण्यासोबतच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेकदा त्या वादाच्या भोवऱ्यातही सापडल्या. मात्र, त्यानंतरही त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला नाही.

बदली झाली, पण कामाची शैली बदलली नाही

सरकारी सेवेत वारंवार बदल्या होणे हे अनेकदा अधिकाऱ्यांसाठी आव्हान ठरते. मात्र, रूपा मौदगिल यांच्या बाबतीत वेगळे चित्र पाहायला मिळते. एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली, तरी प्रत्येक नवीन जबाबदारी स्वीकारताना त्यांनी त्याच कठोर पद्धतीने काम सुरू ठेवले.

गुन्हेगारांवर कारवाई, भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका आणि प्रशासनातील शिस्त यामुळे त्यांचा पोलिस दलात वेगळा ठसा उमटला. त्यामुळेच आजही त्यांचे नाव देशातील धडाकेबाज महिला IPS अधिकाऱ्यांमध्ये चर्चिले जाते.

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कामाची सध्या राज्यभर चर्चा असताना, रूपा मौदगिल यांची २० वर्षांची कारकीर्द, तब्बल ४० बदल्या आणि त्यांच्या कठोर कारवाईचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT