Vishwas Nangare News : IPS विश्वास नांगेर पाटील यांची सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमात बोलत असल्याची एक व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. राज ठाकरेंनी देखील त्यांचावर टीका केली होती. सेवा नियमांचा उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. अखेर आज त्यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले,' यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचा (सेवा नियमांचा) मी भंग केलेला नाही. हा कार्यक्रम 'वंदे मातरम' या आपल्या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आणि 'आरएसएस'ला (RSS) १०० वर्षे पूर्ण झाली, या निमित्तानं सकल हिंदू समाजाकडून आयोजित करण्यात आलेला होता. मी जे काही बोललो, ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगाने योग्य होतं.'
'मी आपल्याला हे सांगू इच्छितो की, मी एक भारतीय पोलिस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता ही भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांशी, तत्त्वांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक होतो आहे आणि राहू.', असे त्यांनी सांगितले.
'हा जो कार्यक्रम आहे तो १९ एप्रिलला आयोजित करण्यात आलेला होता. याचं निमंत्रण घेऊन सकल हिंदू समाज, सानपाडा इथले प्रतिनिधी माझ्याकडे आलेले होते. यामध्ये सांताक्रूझच्या योग इन्स्टिट्यूटच्या ९० वर्षांच्या हंसाजी योगावरती मार्गदर्शन करणार होत्या, इस्कॉनचे प्रमुख डॉक्टर सूरदास प्रभूजी आणि ब्रह्मकुमारीच्या शीला दीदी यांनी स्पिरिचुअल लेक्चर त्या ठिकाणी दिलेलं होतं.'
'मी दरवर्षी रमजान ईदच्या दरम्यान वेगवेगळ्या कपॅसिटीमध्ये महाराष्ट्रात काम केलेलं आहे.३० वर्ष पोलिस सेवेत आहेत. जैन धर्मीयांच्या, बौद्ध धर्मीयांच्या... ख्रिश्चन धर्मीयांच्या कार्यक्रमाला जाणं, त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाला जाणं हे माझं नित्याचं आहे. आणि मी जाते हाही कार्यक्रम संध्याकाळी माझ्या ऑफिसच्या वेळेनंतर होता.' , असे त्यांनी सांगितले.
'मी या कार्यक्रमामध्ये उपनिषदांमधला शांती मंत्र सांगितला, ज्याच्या सिलेक्टिव्ह क्लिप्स फिरवल्या गेल्या. पण दुसऱ्या पण क्लिप्स आहेत त्या आपण कृपया पाहाव्या. यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचा (सेवा नियमांचा) मी भंग केलेला नाही.',
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.