Tamil Nadu political news : आमदारांचे धडाधड राजीनामे अन् सर्वच मित्रपक्ष सत्तेत; मातब्बर विरोधकांना जोरदार झटके...

AIADMK resignations, DMK, Tamil Nadu politics update : अण्णाद्रमुकमध्ये उभी फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाने विजय यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.
Tamil Nadu Assembly
Tamil Nadu AssemblySarkarnama
Published on
Updated on

TVK latest news : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या मित्रपक्षांना धुळ चारली. या निवडणुकीनंतर राज्याचे संपूर्ण राजकारणच बदलताना दिसत आहे. सुरूवातीला सत्तेसाठी आमदारांची जुळवाजुळव करताना विजय यांच्या नाकीनऊ आले होते. पण आता मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतरच्या दोन महिन्यांच्या आतच त्यांनी विरोधकांना जोरदार झटके दिले आहे.

निवडणुकीनंतर दोन दिवसांत काँग्रेसने डीएमकेची साथ सोडत विजय यांच्याशी आघाडी केली. त्यानंतर डावे पक्ष, व्हीसीके, आयूएमएल या पक्षांनी डीएमकेला धक्का दिला. आता वायको यांच्या एमडीएमके या पक्षानेही द्रमुकची साथ सोडण्याचा निर्णय़ घेत विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके हा पक्ष एकटा पडला आहे.

डीएमकेचे मित्रपक्ष सोडून जात असताना दुसरीकडे एआयएडीएमकेलाही मोठे धक्के बसत आहेत. आतापर्यंत पक्षाच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. सत्तास्थापनेवरील जवळपास २५ आमदारांनी टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर करत त्यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतरही आमदारांचे राजीनामा सत्र सुरू झाले. हे आमदार टीव्हीकेमध्ये प्रवेश करत आहेत.

Tamil Nadu Assembly
Maharashtra political crisis : सोबतच राहणार, वाऱ्यावर सोडणार नाही..! राजकारणच असं फिरलंय की, आता कुणाचाच विश्वास बसेना

अण्णाद्रमुकमध्ये उभी फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाने विजय यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. मात्र, पक्षांतर्गत रोषच आमदारांच्या फुटीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात कधीकाळी सत्ता गाजविलेल्या दोन्ही पक्षांना विजय यांनी जेरीस आणल्याचे सध्याचे चित्र आहे.

डीएमकेमधील आमदार सध्यातरी एकजुट असले तरी सर्व मित्रपक्ष साथ सोडून विजय यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या रिक्त झालेल्या एकूण सात जागांवरील पोटनिवडणुकीत विजय यांच्या पक्षाचे पारडे जड मानले जात आहे. विजय यांच्याकडून रिक्त जागांवर टीव्हीकेसह मित्रपक्षांनाही संधी दिली जाऊ शकते. अधिकाधिक जागा ते आपल्याकडेच ठेवत पक्ष अधिक मजबूत करू शकतात.

Tamil Nadu Assembly
Maharashtra Government : राज्यातील 84 हजार आशा सेविकांसह 21 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी लवकरच महत्वपूर्ण निर्णय

विजय यांच्या राजकारणातील पहिल्या एन्ट्रीने विरोधकांना जोरदार हादरे दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आपली आघाडी मजबूत करत आहेत. या निवडणुकांमध्येही टीव्हीके आघाडीचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीएमके आणि एआयडीएमके आता विजय यांना रोखण्यासाठी कोणती रणनीती आखणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com