Minister Gulabrao Patil  Sarkarnama
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांचा महिलांना सल्ला होता, पर्समध्ये 'मिरची पूड' अन् 'रामपुरी चाकू' ठेवा; मंत्री पाटलांनी सांगितली आठवण

Women Day Jalgaon Municipal Corporation Guardian Minister Gulabrao Patil ShivSena founder Balasaheb Thackeray : जळगाव महापालिकेतील महिला दिनाच्या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics : राज्यात महिलांविरोधात वाढलेल्या अत्याचारांच्या घटनांवर विरोधकांसह सत्ताधारी देखील आक्रमक आहे. पण, कुठे ना कुठे प्रवृत्ती महिलांवर अन्याय, अत्याचार करतेच. यातून संपूर्ण समाजात पडसाद उमटतात.

पीडिताला यातून सामाजिक मानसिक त्रासाला मोठ्याप्रमाणात त्रासाला समोरे जावे लागते. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांना आत्म संरक्षणासाठी दिलेल्या सल्ल्याची आठवण करून सांगितली.

जळगाव महापालिकेत महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख तथा हिंदूहृयस्रमाट बाळासाहेब ठाकरे महिलांना आत्म संरक्षणाचा कोणता सल्ला द्यायचे, याची मंत्री पाटील यांनी आठवण सांगताच सभागृह स्तब्ध अन् एकदम शांत झाला.

गुलाबराव पाटील म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की, महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह 'मिरची पूड' आणि 'रामपुरी चाकू' ठेवला पाहिजे. परंतु आताच्या घाण घाण घटना, जर बघितल्या तर महिलांनी आत्म संरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे".

'महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून, महिलांनी देखील आत्म संरक्षणासाठी सज्ज राहावे. महिला सुरक्षेसाठी एसटी महामंडळ विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करणार असून, आरोग्य सेवा मोफत मिळावी, यासाठी जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवले जातील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने मॉल उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहे. महिला सशक्तीकरण आणि सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, भविष्यात महिलांसाठी अधिक सुविधा आणि योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT