Mahadev Jankar News Sarkarnama
महाराष्ट्र

Mahadev Jankar Rally News : परवानगी नसल्याने जानकरांची `जनस्वराज्य यात्रा`, रोखली

RSP : पोलिसांनी रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर व त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : मिशन २०२४ साठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी २२ जुलैपासून राज्यातील लोकसभा मतदारसंघातून `जनस्वराज यात्रे`ला सुरूवात केली. (Mahadev Jankar Rally News) मुंबईतील दोनदिवसीय यात्रेसाठी जानकर व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने सुरूवात केली. पण ही यात्रा अंधेरीत दाखल होताच, पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत ती रोखली.

आज सकाळी चर्चगेट येथून जनस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली. यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. (Mumbai) चर्चगेट परिसरातून निघालेली यात्रा अंधेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असता पोलिसांनी ती रोखली. पोलिसांनी रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) व त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.

यात्रेला पोलिसांची परवानगी नसल्याचे कारण पुढे करत अंधेरी पोलिसांनी यात्रा रोखल्याचे सांगण्यात आले. `जनता के लिए जनता द्वारा जनता का राज, जन स्वराज`, अशा घोषवाक्यासह रासपने (RSP) देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा काढण्याचा निर्धार केला आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून जनस्वराज्य यात्रेला प्रारंभ करण्यात आला होता. २९ आॅगस्ट रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मैदानात यात्रेचा समारोप होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT