

Maharashtra : अजित पवार समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले, तेव्हापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Deepak Kesarkar News) विशेषतः शिंदे कुटुंबासह दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांना भेटून आल्यानंतर तर या चर्चेला अधिकच जोर आला. शाले शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना या संदर्भात विचारले असता, त्यांनी मात्र या चर्चेतील हवाच काढून टाकली.
राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठकीसाठी आले असतांना पत्रकारांनी केसरकर यांना अजित पवार (Ajit Pawar) खरचं मुख्यमंत्री होणार का? या चर्चा खऱ्या आहेत का? असे विचारले. यावर केसरकर यांनी हसत उत्तर दिले.
राज्यामध्ये सत्ता कुणामुळे आली, एकनाथ शिंदे यांच्यामुळे. जनतेने मतदान युतीला केले होते. एनसीपी त्यावेळी सोबत नव्हते पण त्यांच्यातील काही लोकांना आमच्या सरकारचे काम चांगले वाटले. (Deepak Kesarkar) मोदी सरकारचे काम चांगले वाटले म्हणून ते आमच्या बरोबर आले. आमची युती होती, राष्ट्रवादी सोबत आल्याने आता महायुतीचे सरकार झाले आहे.
कार्यकर्त्यांना खुश करावे लागते, त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा होत असावी, असेही केसरकर म्हणाले. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा झाल्यानंतर सत्तेतील शिंदे- भाजपचे मंत्री याचा इन्कार करत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत शिंदेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढच्या निवडणूका लढवल्या जातील, असे सांगण्याची देखील सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातच केसरकर यांनी देखील या विषयावर भाष्य करत राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.