Jai Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Jay Pawar: अजितदादांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी जय पवारांनी कसली कंबर; केला 'हा' खास प्लॅन

बारामतीमधील पणदरे पंचक्रोशीमध्ये १ एप्रिल रोजी प्रचंड गारपीट झाली होती, यामध्ये ज्या शेतकर्‍यांना नुकसान झालं त्यांच्या शिवाराला आज जय पवार यांनी भेट दिली.

कल्याण पाचांगणे : सरकारनामा

माळेगाव: बारामती विधानसभा पोटनिवडणूक पूर्णतः भावनिक आहे. अजितदादांचे अकाली निधन झाले, या दु:खातून अद्याप बारामतीकर सावरलेले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हे पवार साहेबांपासून सर्वांना वाटते. काँग्रेसपक्षाकडून बारामतीत उमेदवारी देण्याबाबत वेगवेगळी स्टेटमेंट येत आहेत, हे खरे आहे. तरीही बिनविरोधसाठी आम्ही विविध पक्षांच्या नेते मंडळींना विनंती करणार आहे. परंतु लोकशाही पद्धतीने जर निवडणूक झालीच, तर बारामतीकर नक्की अजितदादादांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आमच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदींना निमंत्रित केल्याचं जय पवार यांनी यावेळी सांगितलं.

बारामतीमधील पणदरे पंचक्रोशीमध्ये १ एप्रिल रोजी प्रचंड गारपीट झाली होती, यामध्ये ज्या शेतकर्‍यांना नुकसान झालं त्यांच्या शिवाराला आज जय पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकरांशी साधला. सुनेत्रा पवार सोमवार (ता. ६) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, याकडे आपण कसे पहाता? या प्रश्नाला उत्तर देताना जय पवार म्हणाले,``अजित दादा आपल्यातून जाणे आणि निवडणूकीचा हा प्रसंग आपल्या पुढे येईल, हे कोणालाच वाटत नव्हते. परंतू, दुर्देवाने या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी सुनेत्रावहिनींचा अर्ज भरला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेतेमंडळी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनाही निमंत्रित केले आहे``

अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत आपली पत्रकार परिषद लांबली, या प्रश्नावर जय पवार म्हणाले,`` विमान अपघाताबाबत जी माहिती मला मिळाली, त्यापैकी बरचीशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दरम्यानच्या कालावधीत जाहीर केली. त्यामुळे याबाबत अंतिम अहवाल आपल्यावर मी निश्चित या विषयावर बोलणार आहे. पक्ष विलिनिकरणार ते म्हणाले,`` ये पहा..विलीनि‍करणाचा विषय हा वरिष्ठ पातळीवरचा आहे. राहिला प्रश्न पवार कुटुंबियांचा. आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून एकच आहोत. हे चित्र अजितदादा आपल्यातून गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने पाहीले आहे.`` यावेळी तालुकाध्यक्ष संदीप बांदल, योगेश जगताप, विश्वासराव देवकाते, मंगेश जगताप, संजय कोकरे, धुमाळ वाडीचे सरपंच बाळासाहेब कोकरे, उदयसिंह धुमाळ, के.बी.कोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नुकसानग्रस्तांच्या पाठीशी पवार कुटुंबीय...

बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात ऊस, केळी, डाळिंब, कलिंगड, गहू आदी चारा पिकांचे गारपिठीने नुकसान झाले. त्या नुकसान रकमेच्या तुलनेत शासनाकडून मदत व्हावी, अशी आग्रही मागणी गणेश मुळीक, रोहन जगताप, संजय जगताप आदी बाधित शेतकर्‍यांनी केली. यावर जय पवार म्हणाले,`` शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि पवार कुटुंबिय आहे. अजित दादांच्या जागेवर आता सुनेत्रावहिनी उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या शिवारातील पिकांचे पंचनामे करण्यास प्रशासनाला याआगोदरच सांगितले आहेत. त्यानुसार पंचनामान्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राहिला प्रश्न नुकसानीच्या तुलनेत अर्थिक मदत अधिकची होण्याबाबतचा. वहिनीसाहेब, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, पुण्याचे आयुक्त आणि स्थानिक पदाधिकारी यांची एकत्रिक बैठक घेण्याचे मी नियोजन करीत आहे``

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT