Gokul News: कोल्हापुरच्या राजकारणात मोठी घडामोड! गोकुळच्या कारभाराची होणार चौकशी; दोन अधिकारी करणार पोलखोल

Gokul News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाबाबत मोठे घडामोड समोर येत आहे.
Gokul Politics
Gokul Politics Sarkarnama
Published on
Updated on

Gokul News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाबाबत मोठे घडामोड समोर येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर गोकुळच्या कारभाराची चौकशी करणारा आदेश आज पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आजरा तालुक्यातील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या कारभाराबाबत विविध प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Gokul Politics
Farmer's Loan: कोर्टाच्या दणक्यानंतर शासनाला आली जाग! 2017 मधील प्रलंबित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निधी वितरित

गोकुळ दूध संघातील बाराशे सभासद हे बेकायदेशीर आहेत. अशी तक्रार बेलवाडे यांनी विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडे ईमेल द्वारे केली होती. 1200 सभासद ही नियमबाह्य व संशयास्पद असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. शिवाय संचालक मंडळाने नियम व कायद्याला डावलून एकूण 423 सभासद नोंदणी केली असल्याची तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार विभागीय उपनिबंधक यांनी आज या तक्रारीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे.

Gokul Politics
Zirwal News : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवळ यांचा सुनेत्रा पवारांना फोन; आपला कुठलाही दोष नसल्याचं केलं स्पष्ट

चौकशी समितीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सांगली मिरज चौकशीचे प्रमुख असणार आहेत. तर सांगलीचे सहकारी संस्थेचे प.दु.म. जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांची समिती गठीत करण्यात आले आहे. दरम्यान या चौकशी समितीने लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून कार्यालयास सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक यांनी दिलेले आहेत.

Gokul Politics
Pune zilla parishad Politics : अध्यक्षपद हुकल्यानंतर नवा डाव; सभापती पदासाठी माजी आमदारांची लॉबिंग सुरू

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिल्याने गोकुळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ही चौकशी गोकुळच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या निवडणुकीमध्ये या बाराशे सभासदांना मतदानाचा अधिकार असणार आहे की नाही? याबाबत शंका आहे. जर चौकशी समितीचा अहवाल लवकर प्राप्त झाल्यास त्यासंदर्भात अधिक स्पष्टता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com