jayant patil eknath shinde sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil News :...त्यामुळे राज्य सरकारला सर्वजण लाडके झाले; जयंत पाटलांचा आरोप

Political News : लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांना पराभव दिसायला लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सर्वजण लाडके झाले आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक घोषणा करत आहेत. पण राज्यातील जनतेला न्याय दिला जात नाही. त्यामुळे न्याय कधी मिळणार असा प्रश्न आहे. येत्या 2-3 महिन्यांसाठी सर्व निधीचे वाटप करायचे आहे. हे त्यांना व प्रशासनाला ही माहीत आहे. पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांना पराभव दिसायला लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सर्वजण लाडके झाले आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना या अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. ह्या सरकारने तीन अर्थसंकल्प मांडले आहेत. 94 हजार कोटींच्या पुरवणी मागणी मांडल्या आहेत. त्यांना माहित आहे की, काय परिस्थिती होणार आहे. सामान्य विभागाचा, आदिवासी विभागाचा निधी वळविला असल्याचा आरोपही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी केला.

जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. अनेक जीव गेले आहेत. शेतकरी संकटात आहेत. पंचनामे केले जात नाहीत. राज्य सरकार बघायला तयार नाही. कारण सरकारकडे पैसा नाही. अंगणवाडी सेविकाचे त्यांनि पैसे दिल नाहीत. शैक्षणिक सवलतीचा प्रॉब्लेम झाला आहे. काय ठराविक गोष्टी फक्त सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

जागावाटपाची चर्चा करण्यासाठी आम्ही 7 ऑगस्टला बसणार आहोत. त्यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची पहिली मीटिंग होईल. तिन्ही पक्षांनी संकेत पाळले पाहिजे की चर्चा झाल्या की जागावाटप ठरविले पाहिजे. आमच्याकडे घटक पक्ष असून त्यांची ही चर्चा सुरु आहे. हिंदुत्वाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत पूर्ण फेल झाला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून यश मिळविणार आहोत. त्यात आम्हालाही मुंबईमध्ये जास्तीत जागा मिळाव्यात यासाठी आमचा ही प्रयत्न असणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले

लहान मुलांच्या अत्याचारात आठपट वाढ झाली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, अशा अनेक घटना घडल्या आहेत पण सुरक्षा नाही. उरण, पिंपरी चिंचवड, सगळीकडे अशा घटना घडत असून त्याकडे राज्य सरकारचे लक्ष राहिले नसल्याचा आरोप यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी केला.

अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या गुलाबी थीमबाबत बोलताना त्यांच्या कॅंपेनचे थीम ठरले आहे. त्यांचे मार्गदर्शन सुरु आहे. कंपनीचे मार्गदर्शक सल्ले देत आहेत. रंगापासून वागण्यापासून ह्याची काय गुप्तता राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. सोनईचे प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. पक्षात येत आहेत पण उमेदवारीचा आणि त्याचा संबंध नाही. आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशाल गडावर जी घटना झाली, त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. पण भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत, त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी आज त्याच्यावर भाष्य करणे आवश्यक आहे असे वाटत नाही, असे सांगत प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. कोणी ही उमेदवार उभे राहिले तर त्याचा त्या-त्या विधानसभेत परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT