Jayant Pati Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil-Ajit Pawar Video : पक्षफुटीनंतर जयंत पाटील-अजितदादा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, रोहित पवारही राहणार उपस्थित!

NCP Ajit Pawar Rohit Pawar Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत.

Roshan More

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवारांना साथ दिली. पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी संभाळली. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश मिळाले मात्र, विधानसभेला मात्र पक्षाचा पराभव झाला. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील हे वाळवा तालुक्यात एकाच व्यासपीठावर आले नव्हते. मात्र, ते पहिल्यांदा एका व्यासपीठावर येणार आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावर रोहित पवार देखील उपस्थित असणार आहेत.

अजितदादा-जयंत पाटील एकाच व्यासपीठावर येण्याचे निमित्त वाळा तालुक्यातील विधी महाविद्यालयाचे उद्घाटनाचे ठरणार आहे. इस्लामपूर येथील डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालयाचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. अजित पवारांच्या आत्या सरोज पाटील यांच्या हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव देखील आहेत. घरगुती कार्यक्रम असल्याने रोहित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम राजकीय नाही. मात्र, अजित पवार आणि जयंत पाटील हे वाळवा तालुक्यात पहिल्यांदा एका व्यासपीठावर येत असल्याने या कार्यक्रमाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सोडल्यानंतर ते आपल्या मतदारसंघात बारकाईने लक्ष देत आहेत. त्यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात रणनीती आखत आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. या स्थिती अजित पवारांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येत असल्याने ते नेमके काय बोलणार याविषयी उत्सुकता आहे.

अजित पवारांनी केली होती टीका

विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार हे इस्लामपूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी विकासकामांच्या मुद्यावरून तसेच उस दर आणि अन्य कारणांवरून जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. जयंत पाटील यांन देखील अजित पवारांना प्रत्युत्तर दिले होते. आता दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने दोघांच्या समर्थकांचे लक्ष या कार्यक्रमात ते काय बोलतात याकडे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT