Jayant Patil On Maharashtra Day : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र वासियांना जाहीर पत्र लिहिले आहे. या पत्रातून पाटील यांनी आपला भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. तसेच मराठीची हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
जयतं पाटलांनी पत्रात म्हटले आहे की, 'यंदा महाराष्ट्र राज्य आपला ६५वा स्थापना दिन साजरा करत आहे. गेल्या 65 वर्षात महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औधोगिक, शैक्षणिक या सर्व स्तरांत उत्तुंग कामगिरी केली. पण मधल्या काळात महाराष्ट्राची प्रचंड पिछेहाट झाली आहे.
'दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूवर हात टाकला जात आहे, पाण्यासाठी लोकांना जीव गमवावा लागत आहे, शेतकरी हवालदिल होऊन आपले प्राण त्यागत आहे. राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर 'हिंदी'चे भूत बसले असल्याने आपल्याच घरात 'मराठी' हाल सोसत आहे. आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार?' असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.'
आता हे कुठपर्यंत सहन करायचे? यासाठीच मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले होते का? होत्याचं नव्हतं झालं तर येणा-या पिढीला आपण काय उत्तर देणार? मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, असे आवाहन देखील पाटील यांनी आपल्या पत्रातून केले आहे.
1960 साली स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. स्व. यशवंतराव चव्हाण म्हणाले त्याप्रमाणे हा 'सोनियाचा दिवस' आपल्याला सहज मिळाला नाही, तर त्यासाठी तब्बल 106 हुतात्मांनी आपले बलिदान दिले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर २१ नोव्हेंबर १९५६ साली झालेल्या मोर्चाचे देता येईल. मोर्चा चिरडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, मुंबई, महाराष्ट्र आणि माय मराठीसाठी तिच्या लेकरांनी प्राणांची आहुती दिली तेव्हा मराठी देश स्थैर्य प्राप्त करू शकला आहे, असे देखील पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.