Jayant Patal sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil : गद्दारांचा हिशोब करायचा आहे! जयंत पाटलांनी चंदगडात जाऊन कुणाला दिला इशारा

Rahul Gadkar

Jayant Patil News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कागल विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा संघर्ष निर्माण करण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना यश आले असताना त्यांची नजर आता चंदगडकडे वळली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच चंदगड विधानसभा मतदारसंघात मेळावा घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांना त्यांच्याच होमपिचवर इशारा दिला आहे.

'येथील आमदार हे शरद पवार यांच्या जीवावर निवडून आलेत. मात्र निवडून आल्यानंतर ते गद्दार निघाले. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर काय होतं हे लोकसभा निवडणुकीत कळले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दारांचा हिशोब करा.', असा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे नाव न घेता दिला.या गद्दारांच्या पराभवासाठी जनतेने तुतारी वाजविणाऱ्या माणसामागे ताकदीने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास खचल्याने त्यांना आता लाडक्या नसलेल्या बहिणी लाडक्या वाटू लागले आहेत. केवळ खुर्चीसाठी ही योजना आणली आहे. विधानसभेत विजय केला तरच ही योजना पुढे चालेल, अशी धमकी सत्ताधाऱ्यांकडून दिली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो.

रस्ते, पुलांना भेगा पडत आहेत. अनेक मंदिर आणि संसदेला गळती लागत आहे. त्यावरूनच कळते हे सरकार किती भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे गद्दारांचा हिशोब करावाच लागेल', असा इशारा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

मविआचे सर्व नेते सोबत

सत्ताधाऱ्यांकडे जेवढी साधन संपत्ती आहे तेवढी आपल्याकडे नाही. पण जनतेचा आशीर्वाद आणि शरद पवार साहेबांची साथ आपल्याकडे आहे. त्यामुळे उद्याची लढाई आपण यशस्वी पार पाडूया. तुतारी घरोघरी पोहोचवण्यासाठी बाभुळकर व कुपेकरांनी 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याची गरज आहे. महाविकास आघाडी मधले सर्व नेते तुमच्या सोबत असतील असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT