Narayan Rane News : शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने 'जोडो मारो' आंदोलन केले. या आंदोलनावरून खासदारा नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर राजकारण करत असल्याची टीका करत संजय राऊतांवर गंभीर आरोप करत अटक करण्याची मागणी केली.
संजय राऊतला निवडणुकीसाठी दंगल घडवायच्या आहेत. सत्तेत येण्यासाठी त्यांना दंगली करायच्या आहेत, राज्य सरकारने ताबडतोब त्याला अटक करावी, असे नारायण राणे म्हणाले.
'शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत तेथे पोहोचला. त्याने कोसळलेल्या पुतळ्यावर टाकलेले पांढरे प्लॅस्टिक बाजुला करत फोटो काढले. त्या फोटोतून संजय राऊत भडकवा भडकवी करतोय. सरकारने त्याला त्वरीत अटक करावी', अशी मागणी नारायण राणे यांनी केली.
निवडणुका आहेत म्हणून कसेही नाचाल? उद्धव ठाकरे गेट आऊट म्हणत आहेत. त्यांना अधिकार आहे का? कोण आहेत ते? एक होते बाळासाहेब आणि हा त्यांचा मुलगा. बाळासाहेब करारी होते. हा शरद पवार, सोनिया गांधी यांचे उंबरे झिजवतोय मला मुख्यमंत्री करा म्हणून, असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
तुमची सत्ता कशी येईल. अडीज वर्षात काय केलं? फक्त दोन दिवस मंत्रालयात. महाविकास आघाडीत काही नाही. आमचे पवार साहेब थोडे खासदार वाढले तर म्हणतात की आम्ही सत्तेत येणार. आम्ही कसे येऊ देऊ, असे आव्हान नारायण राणे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.