Jayant Patil’s resignation rumors denied by NCP Sharad Pawar faction; official clarification by Jitendra Awhad. Sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी : जयंत पाटील अजूनही 'प्रदेशाध्यक्ष' पदावर कायम; 'राजीनाम्याची' बातमी केवळ अफवाच!

Jayant Patil resignation news is false, confirms Jitendra Awhad; NCP Sharad Pawar party clarifies speculation : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा, अशा बातम्या आज (12 जुलै) सकाळपासून माध्यमांमध्ये आहेत. मात्र या बातम्या केवळ अफवाच असून त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समोर आले आहे.

Hrishikesh Nalagune, अजित झळके, सांगली

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा, अशा बातम्या आज (12 जुलै) सकाळपासून माध्यमांमध्ये आहेत. मात्र या बातम्या केवळ अफवाच असून त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच स्वतः जयंत पाटील हेही याबाबत रात्री माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत.

मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 'सकाळ' सांगली प्रतिनिधींकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. तसेच जयंत पाटील हे रात्री राजीनामा दिला नसल्याचा खुलासा करण्यासाठी माध्यमांसोबत संवाद साधणार असल्याचा निरोप असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले.

2018 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 2024 पासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वात पक्षाने 2019 आणि 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली होती. पण मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात देखील जयंत पाटील यांनी देखील आपल्याला जबाबदारीतून मोकळं करावं अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली होती.

त्यानंतर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नाव अंतिम झाल्याचे सांगितले गेले. 15 जुलै रोजी शरद पवार यांनी एक बैठक बोलावली असून यात शशिकांत शिंदे यांची निवड होणार असल्याचे बोलले गेले. पण आता अद्याप जयंत पाटील यांनीच राजीनामा दिला नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगितले आहे. त्यामुळे पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT