Nilesh Lanke On Jayant Patil : पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार का? लंके म्हणाले, 'मुंबईत 15 जुलैला बैठक, पवारसाहेब 'A टू Z''

NCP Jayant Patil Resignation Ahilyanagar MP Nilesh Lanke Reacts : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यावर खासदार नीलेश लंकेंनी प्रतिक्रिया दिली.
Nilesh Lanke On Jayant Patil
Nilesh Lanke On Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP Sharad Pawar faction : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावर अहिल्यानगरमधील पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"जयंत पाटील अस्वस्थ होते का? पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार का? शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. रोहित पवारांनी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावा, अशी जाहीर मागणी केली होती. या सर्व प्रश्नांवर मुंबईत 15 जुलैला बैठक, असून 'A टू Z' शरद पवारसाहेब आहेत", असे खासदार लंके यांनी म्हटले.

नीलेश लंके म्हणाले, "जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राजीमाना दिल्याची बातमी, माध्यमांकडून समजली. माझ्या कानावर कुठलीही गोष्टी नाही. परंतु 15 जुलैला शरद पवारसाहेब यांच्या उपस्थित मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत बरीच चर्चा होईल".

प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांचे नाव पुढं येत आहे, यावर बोलताना नीलेश लंके म्हणाले, "नाव कोणाचं पुढं येत आहे, कुणाचं नाही, याची मला माहिती नाही. पण सर्व अधिकारी शरद पवारसाहेब (Sharad Pawar), सुप्रियाताई अन् जयंत पाटील यांचे आहेत".

Nilesh Lanke On Jayant Patil
Nilesh Lanke Shirdi Road : गडकरींना लाज वाटतेय, त्याच रस्त्यासाठी पवारांच्या शिलेदाराचं उपोषण; मंत्री विखेंच्या बैठकीवर लंकेंचा निशाणा

शरद पवार यांच्या पक्ष संघटनेत नवीन जबाबदारी मिळणार का? यावर बोलताना नीलेश लंके यांनी, "पक्षात जबाबदारी मिळो किंवा नाही मिळो, पण पक्षासाठी काम केलं पाहिजे ही सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. पक्ष अडचणीच्या काळात काम केलं पाहिजे, या भावनेतून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत".

जयंत पाटील पक्षात अस्वस्थ होते, असे बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. त्यावर बोलताना 'माध्यमांद्वारे ही बाहेर चर्चा पसरवली गेली आहे. पक्षामध्ये कुठलीही अस्वस्थता नाही. पक्षात आनंदी वातावरण आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नव्हे, तर आदरणीय पवारसाहेबांचा परिवार आहे. परिवारामध्ये एकदम आनंदी वातावरण आहे. त्यामुळे कुठलेही मतभेद नाहीत', असे नीलेश लंके यांनी म्हटले

रोहित पवार यांनी पक्ष संघटनेतील बदलाबाबत जाहीर बोलले होते. त्यावर बोलताना, 'एका कार्यक्रमात, एखाद्या व्यासपीठावरून मागणी करणे हे काही चुकीचे नाही. त्यांनी मागणी केली, याचा अर्थ निर्णय झाला असे होत नाही. पक्षाच्या निर्णय अधिकार शरद पवारसाहेबांना आहे. सुप्रियाताईंना आहेत. मी छोटा कार्यकर्ता आहे. दिलेली जबाबदारी पार पाडतो. त्यामुळे अशा गोष्टींवर भाष्य करणे देखील योग्य नाही', असे नीलेश लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com