Jayant Patil Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतात. जयंत पाटील यांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर स्पष्टपणे आपले मत मांडले.
भाजपमध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे ऑफर आहे का? असे जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'माझ्याकडे काहीच नाही, अशी चर्चाही नाही. महाराष्ट्रात यंत्रणा कार्यरत असते. मधूनमधून ती यंत्रणेला माझी आठवण येते. आणि माझ्या बद्दल अविश्वासर्हता निर्माण व्हावी, विश्वासहर्तवर प्रश्न निर्माण व्हावं असं प्रयत्न ज्या सेक्शन होतो ते पुन्हा कार्यरत होते.'
जयंत पाटील भाजपात जाणाऱ्या अशा बातम्या पसरवणाऱ्या यंत्रणेबद्दल बोलताना ते म्हणाले, 'ते सेक्शन मला आयडेंटीफाय झाले नाही. ते सेक्शन पक्षाच्या बाहेरील असेल बहुतेक. मात्र, या चर्चांमुळे राजकीय तोट होत नसेल असं माझं म्हणणं नाही. परंतु आता लोकांना देखील ती बातमी शिळी वाटते. आठ दहा वर्ष तेच चाललं आहे. लोकांनाही त्या बातमीत नाविन्य वाटत नसेल.'
जयंत पाटील भाजपात चाललेत ही ही बातमी उठवून आमच्या बरोबरच्या इतर सहकाऱ्यांना सांगितलं जात असेल की ते निघालेत तुम्ही लवकर निर्णय करा, असं होत असेल, असा अंदाज देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला. भाजपात माझ्यासाठी एक मंत्रिपद रिक्त ठेवलं आहे असे भाजपातील लोक उघडपणे सांगतात ते माजी खरे हितचिंतक आहे. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी, प्रेम आहे म्हणून ते निरागसपणे बोलत असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले, असा अंदाज होता का? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, अंदाज नव्हता मात्र काही लोकांकडून आग्रही होता, असे सांगितले. आपण भाजपसोबत सत्तेत गेले पाहिजे असा आग्रही काही लोक धरत होते. मात्र, शरद पवारसाहेब त्याला मान्यता देत नव्हते. त्या बाजुला मला येत येणार नाही, असा त्यांचा स्टँड होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.