Jitendra Awhad Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या घरात घुसून शुटींग करणाऱ्या पोलिसाला पकडलं, विरोधी पक्षाच्या आमदारांवर 'वाॅच'?

Jitendra awhad caught the policeman : आपण कोणाच्या घरी जातोय? आपल्याला काय अधिकार आहे? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस कर्मचाऱ्याला विचारला.

Roshan More

Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही पत्रकार परिषद आव्हाड यांच्या ठाण्यातील घरी होती. मात्र, घरात शिरून शुटींग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला जितेंद्र आव्हाड यांनी पकडले. या पोलिस कर्मचाऱ्यावर आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

हा पोलिस कर्मचारी गोपीनीय विभागतील असल्याची माहिती आहे. त्यामुळे गोपनीय विभागाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर वाॅच ठेवला जात असल्याचे समोर आले आहे.

आव्हाड यांनी चित्रकरण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची झाडाझडती घेतली. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा. आपण कोणाच्या घरी जातोय? आपल्याला काय अधिकार आहे? माझ्या घरात घुसताय म्हणजे माझी काही प्रायव्हेसी आहे की नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती आव्हाड यांनी केली.

आव्हाड यांनी पोलिस कर्मचाऱ्याला वरिष्ठांना फोन करण्यास सांगितले तसेच जो पर्यंत वरिष्ठ बोलत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असे म्हटले तसेच तुला येथे येण्यास कोणी सांगितले याची विचारणा केली.

त्या कर्मचाऱ्याची नोकरी जायची

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या पोलिस कर्मचार्‍याला पकडण्यात आलं त्यांनी मला सांगितलं की वरिष्ठांनी मला येथे येण्यास सांगितले होते. त्यामुळे मी आलो. मी स्वतः त्यांच्या वरिष्ठाकडे गेलो तो स्वतः गेला तर त्याला सस्पेंड करतील. त्या गरीबाची नोकरी जायची. त्यामुळे जाऊद्या हे सगळं, असे आव्हाड म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT