
Shivsena News : शिवसेनेतील फुटीपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. मात्र, राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते. अर्थातच ही भेट संबंध राज्यात आणि देशात चर्चेचा विषय ठरली होती.या भेटीनंतर या दोन्ही पक्षातील वाद कमी होईल, असे वाटले होते. मात्र, तसे घडले नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर अनेकदा आरोप आणि टीका केली.
सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी चक्क फडणवीसांचे कौतुक केले आहे. त्यांच्या या अग्रलेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केल्याबद्दल राऊतांनी कौतुक केले आहे. त्यातच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील फडणवीसांचे कौतुक केले तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाडा येथे शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'एखादे चांगल काम केले असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे. राजकारण म्हणजे हातात भाले तलवारी घेऊनच उभे राहील पाहिजे असे काही नाही. ज्या मुख्यमंत्र्यांचा कौतुक केले जात आहे, त्या मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांसाठी सारख्या गोष्टींची अपेक्षा आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडे अपेक्षा आहेत. ते महिलांच्या प्रश्नांकडे पाहतील, ज्या महिला खऱ्या अर्थाने पीडित आहे अशाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अंधारे म्हणाल्या.
पक्ष सोडून जाणाऱ्यांना दिल्या शुभेच्छा
पुण्यातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. काही लोक हे संकट काळात देखील सोबत असतात. पण काही जणांना संघर्षाचा काळ नको असतो, म्हणून ते सत्तेत सहभागी होतात. त्यामुळे आत्ता जे गेले त्यांना शुभेच्छा, असे अंधारे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.