Jitendra Awhad On Waqf Board .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awhad On Waqf Board Amendment Bill: जितेंद्र आव्हाडांचा नवा बॉम्ब; म्हणाले,अंबानींचं घर 'वक्फ'च्या जमिनीवर...

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा आणि विरोध यावरुन एकमेकांच्या विरोधात उभी ठाकल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्फ बोर्ड विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : वक्फ बोर्ड विधेयकावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आणि विरोधकांमध्ये चर्चेदरम्यान जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.राज्यातही वक्फ बोर्डाच्या विधेयकावरुन महायुती सरकारमधील भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतेमंडळींमध्ये जोरदार घमासान सुरु आहे.अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धक्कादायक विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा आणि विरोध यावरुन एकमेकांच्या विरोधात उभी ठाकल्याचे दिसून येत आहे.याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्फ बोर्ड विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी अंबानींचं घर हे वक्फ बोर्डाच्या (Waqf Board Amendment Bill) जमिनीवर असल्याचं विधान केलं आहे.यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आव्हाड म्हणाले, अंबानींच घर हे वक्फच्या जमिनीवर आहे, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला असून सध्या दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील जमिनी देखील मोकळ्या बाजारात येणार आहेत. त्यांनी याचवेळी वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? असा सवालही उपस्थित केला.

तसेच एकदा जमीन वक्फ करण्यात आली म्हणजेच मुस्लिम समाजासाठी दान करण्यात आली. परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही.आता कायदा करायचा असेल तर असा करा की, या जमिनीकडे कोणी वेडेवाकड्या नजरेनं पाहणार नाही. त्यांच्या वाड-वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत,अशी भूमिकाही आव्हाड यांनी यावेळी वक्फ विधेयकाला विरोध करताना मांडली.

लोकांच्या धार्मिक विषयात जायची केंद्रातील सरकारला जाण्याची काय आवश्यकता आहे. पण सरकारकडून संविधानाच उल्लंघन करण्याचं काम सुरू आहे. याचवेळी त्यांनी आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. हिंदू मंदिरात अब्जो रुपयांचे सोन आहे, आता हे सोनं तुम्ही ताब्यात घेणार का? अशी विचारणा करत सरकारनं याचं उत्तर आपल्याला द्यावं, असंही आव्हाड म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात, वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?”, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT