Summons to Mahayuti MLAs : महायुतीच्या 'या' दोन आमदारांना न्यायालयाचे समन्स ; तीन आठवड्यात म्हणणे सादर करण्याचे निर्देश!

Bombay high court nagpur bench : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि कोण आहेत ते दोन्ही आमदार?
Court Hammer
Court Hammer Sarakarnama
Published on
Updated on

Vidharbha Political News : विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. आपण पराभूत झालो यावर अद्यापही त्यांचा विश्वास बसत नाही. निवडणूक मॅनेज केल्याची शंका त्यांना आहे. याकरिता काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि अकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार महेश गणगणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

त्यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तिवसा मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार राजेश वानखडे आणि अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना समन्स बजावला आहे. या आमदारांना तीन आठवड्यात आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) या महिला व बाल कल्याणमंत्री होत्या. मोदी लाटेतही त्यांना भाजप पराभूत करू शकली नव्हती. २०२४च्या निवडणुकीत मात्र त्यांचा धक्कादायक पराभव झाला. राजेश वानखडे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. मतदारांचा कौल बाजूने असताना पराभूत झालेल्या ठाकूर यांना निवडणुकीत काहीतरी गडबड झाल्याची शंका आहे.

Court Hammer
Vande Bharat Express : 'आयफेल टॉवर'पेक्षाही अधिक उंच पूलावरून धावणार 'वंदे भारत एक्स्प्रेस'

विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या (MVA) जवळपास सर्वच पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. ईव्हीएमने निवडणूक घेण्याची अधिसूचना काढण्यात आली नव्हती, लोकसभेनंतर अचानक मतदार कसे वाढले, वाढीव मतदारांची मते महायुतीच्याच उमेदवारांना कशी काय पडलीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच उमेदवार असतानाही सीसीटीव्हीचे फुटेज दिले जात नाही, पैसे भरूनही व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात नाही, असाही त्यांचा आक्षेप आहे. महेश गणगणे हे अकोट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा महायुतीचे प्रकाश भारसाकळे यांनी पराभव केला आहे.

Court Hammer
Waqf Board Amendment Bill : ''दुरुस्ती विधेयकास जे विरोध करताय ते मुस्लिम नाहीत'' ; उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं मोठं विधान!

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे आणि सत्तासुद्धा स्थापन केली आहे. उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुती सरकारने तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. असे असताना निवडणुकीच्या निकालावरचे शंकेच मळभ अद्याप दूर झालेले नाही.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com