Jitendra Awhad Sarkarnama
महाराष्ट्र

Akshay Shinde case : जितेंद्र आव्हाडांचा गंभीर मुद्दा, "'Political Heroism' आणि जवळच्याला वाचवण्याचा प्रयत्न"

Jitendra Awhad Akshay Shinde case raised serious issues before the rulers : बदलापूर इथल्या बाललैंगिक अत्याचारातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी ठार केलेल्याच्या प्रकारावर जितेंद्र आव्हाडांचा सत्ताधाऱ्यांसमोर गंभीर मुद्दे उपस्थित केलेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : बदलापूर इथल्या नामांकित शाळेतील दोन चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने केलेल्या झटापटीत पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. मुंब्रा बाह्यमार्गाजवळ पोलिस वाहनात झालेल्या, या प्रकारात तो ठार झाला असून, विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावरून जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावर गंभीर मुद्दे उपस्थित केलेत.ॉ

"सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत 'Political Heroism' आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरवातीपासून आहे", असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

या चकमकीत विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रवक्त तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर मोठा आरोप करत शाळा आणि संस्थाचालकांची ओळख पलवण्याचा प्रयत्न आहे. अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. यावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना यातून बरच काही साध्य करायचं असल्याचं विरोधकांचा आरोप आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात तीन गोष्टी घडल्याकडं लक्ष वेधलं. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर, पोलिसांवर (Police) दबाव आणि शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न दिसतो, असे सूचक एक्सवर पोस्ट करत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.

या सगळ्यानंतर अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपित माहीत होते का? इथं शाळा आणि संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे. हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू करा!, असे जितेद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आरोपीच बाजू घेतच नाही...

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाहीत. आम्हालाही हेच वाटतं की, या अक्षम्य आणि घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाही, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे, आणि यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच.

सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत 'Political Heroism' आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरवातीपासून आहे. महाराष्ट्रातील जनता, असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT